इराणविरोधातील अमेरिका-इस्रायल युद्ध सुरू होणे,थांबणे आणि पुन्हा सुरू होणे, याचा तेलबाजारांवरझालेल्या परिणामाचा विचार करणे आवश्यक आहे.युद्ध सुरू झाल्यापासून तेलबाजारात मोठी अस्थिरतादिसून आली. मात्र, किंमतींतील चढ-उतार हे मागणीआणि पुरवठ्यापेक्षा बदलणाऱ्या धारणा आणि अपेक्षांचेअधिक प्रतिबिंब होते. या अपेक्षांवर अनेकदा अमेरिकेचेअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समाजमाध्यमांवरील पोस्ट्सचा प्रभाव पडला. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम झाला.मात्र, सागरी वाहतुकीतील अंतर आणि विलंबामुळेत्याचा तातडीचा फटका ग्राहक आणि उत्पादकांनाबसला नाही. तरीही, अधिकृत स्तरावर परस्परविरोधी घोषणांमुळे बाजाराच्या अपेक्षा सतत बदलत राहिल्या आणि तेल तसेच नैसर्गिक वायूच्या किमतींमध्ये मोठी अस्थिरता निर्माण झाली. जुलैच्या सुरुवातीला अमेरिका आणि इराण यांच्यात प्राथमिक युद्धविराम झाल्यानंतर कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल 70 डॉलरच्या खालीआला. युद्ध सुरू होण्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये तो याचपातळीवर होता. त्यानंतर पुन्हा संघर्ष सुरू झाल्यानंतरहीआतापर्यंत तेलाच्या किमतींमध्ये केवळ मर्यादित वाढझाली आहे. जागतिक ऊर्जा बाजारातीलअस्थिरतेनंतरही अमेरिकेच्या शेअर बाजाराने एप्रिल तेजून या कालावधीत 2020 नंतरची सर्वोत्तम तिमाहीनोंदवली. जुलैच्या सुरुवातीलाही ही तेजी कायमराहिली. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातीलसमभागांनी या वाढीचे नेतृत्व केले. एआयमुळेउत्पादकता आणि आर्थिक विकासाला अभूतपूर्वचालना मिळेल, या विश्वासामुळे गुंतवणूक वाढली.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ)अंदाजानुसार विकसित अर्थव्यवस्थांचा सकल देशांतर्गतउत्पादन (जीडीपी) वाढीचा दर 1.7 टक्के राहील, तरअमेरिकेचा विकासदर 2.3 टक्के राहण्याची अपेक्षाआहे. आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेच्या(ओईसीडी) सदस्य देशांमध्ये एप्रिलमध्ये बेरोजगारीचादर 5 टक्के होता, जो फेब्रुवारी 2022 पासून जवळपासस्थिर आहे. विकसित अर्थव्यवस्थांमधील यालवचिकतेचे मोठे श्रेय कृत्रिम बुद्धिमत्ता आणिक्रिप्टोकरन्सी क्षेत्रातील अलीकडील गुंतवणूकवाढीलादिले जाते. चीन, तैवान, दक्षिण कोरिया आणि मलेशियायांसारख्या अनेक आशियाई अर्थव्यवस्थांनाही त्याचालाभ झाला आहे. आर्थिक बाजारपेठांमधील सध्याचाआत्मविश्वास या समजुतीमुळेही वाढला आहे की,दोन्ही बाजूंच्या आक्रमकतेनंतरही इराणबरोबरचे युद्धप्रत्यक्षात संपले आहे किंवा ते कमी तीव्रतेच्या संघर्षाच्यास्वरूपात सुरू राहील. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतूनकाही प्रमाणात वाहतूक सुरू राहू शकेल.युद्धविरामानंतरही आखाती देशांतून होणारी तेलनिर्यातयुद्धपूर्व पातळीपेक्षा लक्षणीय कमी राहिली. भविष्यातनिर्यात पूर्णपणे पूर्ववत झाली तरी आजच्या ऊर्जासंकटाची किंमत कमी उत्पन्न असलेल्या देशांना पुढीलअनेक वर्षे मोजावी लागेल. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या पेट्रोलियम उपउत्पादनांमध्येखतांचा समावेश होतो. शेतीसाठी ही खते अत्यावश्यकआहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या(एफएओ) अंदाजानुसार, 2026 च्या पहिल्यासहामाहीत जागतिक खतांच्या किमतींमध्ये 15 ते 20टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः कमीउत्पन्न असलेल्या देशांतील शेतकऱ्यांना वाढत्याखतांच्या किमतींबरोबरच सिंचन , वाहतुकीसाठीलागणाऱ्या इंधनाच्या वाढत्या खर्चाचाही सामना करावालागेल. खतांच्या वापरात किरकोळ घट झाली, तरीपिकांच्या उत्पादनात मोठी घट होऊ शकते. जागतिकबँकेच्या अंदाजानुसार, चीन आणि भारत वगळताविकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमधीलदरडोई उत्पन्नाल दरी कोरोना महामारीपूर्व पातळीवर2028 नंतरच परत येईल. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) विकसित आणि विकसनशीलअर्थव्यवस्थांमधील दरडोई उत्पन्नातीलदरी कोरोना महामारीपूर्व पातळीवर 2028नंतरच परत येण्याची शक्यता आहे.ग्लोबल साऊथमधील अनेक देशांनी यायुद्धामुळे विकासाचे संपूर्ण एक दशकगमावले आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



