अभिनेता गोविंदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे सध्या सतत चर्चेत आहे. पत्नी सुनीता अहुजाने त्याच्यावर विवाहबाह्य संबंधापासून ते मुलाचं करिअर घडवण्यासाठी काहीच पावलं उचलली नसल्याची टीका केली. इतकंच नव्हे तर “तू तुझ्या वडिलांसारखा अजिबात बनू नकोस” असा सल्ला सुनीताने तिच्या मुलाला दिला. या सर्व आरोपांवर आता गोविंदाने प्रतिकिया दिली आहे. कुटुंबासाठीच मी राजकारणातून बाहेर पडलो आणि साजिद नाडियादवालाकडे मुलासाठी मदत मागितल्याचा खुलासा त्याने केला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने त्याच्या पत्नीच्या आरोपांवर भाष्य केलं.
“कुटुंबासाठी राजकारण सोडलं”
“ज्यावेळी, मी राजकारणातून बाहेर पडलो, तेव्हा मी विचार केला की माझ्यासोबत असलेली स्पर्धा, द्वेष, ईर्षा यांचा माझ्या कुटुंबीयांना कोणताही त्रास होऊ नये. विशेषकरून मुलांखातर मी राजकारण सोडून दिलं. मी साजिद नाडियादवालाकडे मुलाची शिफारस केली. त्याने यशसाठी केबिन दिलं. चित्रपट कसे बनवले जातात, काम कसं चालतं हे सगळं त्याला समजावून सांगितलं. घरात आधीपासूनच असं वातावरण होतं की मी इंडस्ट्रीतील नाती जपण्यात अपयशी ठरलोय. मला फार काही विचारलं गेलंच नाही”, असं गोविंदाने स्पष्ट केलं.
“घरातलेच असं म्हणू लागले तर मी कुठे जाऊ?”
याविषयी गोविंदा पुढे म्हणाला, “मुलांसाठी मी काही करू शकेन, यासाठी मी स्वत: देवाकडे प्रार्थना करतो. माझ्याच घरातले लोक असा विचार करू लागले तर मी कुठे जावं? 18 नवीन दिग्दर्शक आणले, 19-20 निर्माते आणले, 12-13 कलाकार आणले आणि जेव्हा देवाने वेळ दिला, तेव्हा मी पूर्ण सेवा प्रदान केली. या विषयावर मी आणखी चर्चा करणार नाही. याने माझाच अनादर होईल. यशबद्दल बोलायचं झाल्यास, टेक्निकली तो माझ्यापेक्षा उत्तम हे. त्यामुळे त्याला योग्य संधी मिळाली, तर तो नक्की मोठा कलाकार बनू शकेल.”
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या आरोपांवर उत्तर
या मुलाखतीत गोविंदाने त्याच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या आरोपांवरही उत्तर दिलं. “मला सांगा, माझ्यावर असे आरोप कधी लागले नव्हते? सुरुवातीला अभिनेत्रींना स्पर्श करतानाही माझा हात थरथर कापायचा. तेव्हासुद्धा लोकांनी आरोप केले होते. त्यामुळे जे आरोप लावले जात आहेत, ते माझ्या बालपणातील प्रेम आहे. प्रेमाच्या बाबतीत मी कधीच बरोबर चाललो नाही. तरुणाईतल्या प्रेमानेही मला सोडलं. आता ज्या प्रकारे माझ्यावर आरोप होत आहेत, तर हे म्हातारपणातील प्रेम आहे. मी चार-चार मिस युनिव्हर्स हिरोइन्ससोबत काम केलंय. त्यांच्याकडे मी कधी बघायचोसुद्धा नाही. कोणतीच अभिनेत्री माझ्यावर आरोप करू शकत नाही की मी तिला त्रास दिला किंवा अपशब्द म्हटले”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.
अभिनेत्रीसोबत नाव जोडल्याबद्दल तो पुढे म्हणाला, “जी हिरोइन माझ्या घरी येतेय, माझ्या घरातल्या चित्रपटाने करिअर सुरू होतंय, मी कधीच खोटं बोलणार नाही. मी सर्व कलाकार आणि खासकरून अभिनेत्रींचे आभार मानतो. त्यांच्यामुळे मी वर्षानुवर्षे इंडस्ट्रीवर राज्य करू शकलो. मी कधीच कोणाशी गैरवर्तन करत नाही आणि अशात ती माझं नाव घेत आहे. माझी आई मला म्हणायची की, गोविंद जेव्हा कुटुंबातील चार सदस्यांना तू तुझं जग मानून बसलास, तर एके दिवशी जेव्हा ते तुझी फसवणूक करतील, तेव्हा तू काय करशील? आणि हे जग जे तुझ्यावर प्रेम करतं, ते मूर्ख आहे का? त्यांचे पैसे हे पैसे नाहीत का, त्यांची आब्रू ही आब्रू नाही का? त्यामुळे मी सर्व अभिनेत्रींचा, जे आता आहेत आणि पुढेही बनतील त्यांचं माझ्या घरात स्वागतच ककतो. मी आज याठिकाणी तुमच्यामुळेच आहे.”
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




