3 मे रोजी झालेल्या नीट-यूजी 2026 परीक्षेची(देशभरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतीलप्रवेशासाठीची केंद्रीय परीक्षा) प्रश्नपत्रिका फुटल्यानंतरपरीक्षा रद्द करण्यात आली. हा निर्णय लाखो विद्यार्थीआणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमीनव्हता. या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबांनी अनेकमहिने किंबहुना अनेक वर्षे, या एका परीक्षेमुळेभविष्यातील चांगल्या आयुष्याचे दार उघडेल याआशेवर आयुष्य रोखून ठेवले होते. आता नव्याने परीक्षा21 जून रोजी घेण्याचे निश्चित झाले असले तरी परीक्षारद्द होण्याचा परिणाम अधिक गंभीर होत चालला आहे. आतापर्यंत किमान तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलीअसून हजारो विद्यार्थी मानसिक नैराश्याशी झुंज देत आहेत. त्यांच्या समोर पुन्हा एकदा चिंता, अनिश्चितता आणि कठोर अभ्यासाचे दुष्टचक्र उभे राहिले आहे. सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेशदिले असून आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे. प्रश्नपत्रिका फुटीचे हे प्रकरण आता अनेक शहरांमध्ये पसरलेल्या घोटाळ्याचे रूप घेताना दिसत आहे. केंद्रीयशिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सरकारला पात्रविद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागू नये, म्हणून परीक्षारद्द केल्याचे सांगितले. त्यांनी पुढील वर्षापासूननीट-यूजी परीक्षा पेन-पेपर पद्धतीऐवजी संगणकावरऑनलाइन घेतली जाईल, असेही स्पष्ट केले. तसेचपुनर्परीक्षा द्यायची नसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कपरत दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, 3 मेरोजी परीक्षा दिलेल्या सुमारे 22.05 लाख विद्यार्थ्यांसाठीपरीक्षा शुल्क महत्त्वाचे नाही. देशातील स्पर्धा परीक्षाव्यवस्था विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या कुटुंबीयांकडूनमोठी किंमत वसूल करते. नुकतेच किशोरवयातून बाहेरपडलेल्या मुलामुलींना कोटा, सीकर, प्रयागराजयांसारख्या शहरांतील ‘कोचिंग फॅक्टरी’मध्ये पाठवलेजाते. ते मित्रांपासून दूर जातात. त्यांची दिनचर्याविस्कळीत होते आणि ते शारीरिक तसेच मानसिकसमस्यांशी झुंज देतात. विशेषतः टियर-2 आणि टियर-3शहरांतील मध्यमवर्गीय कुटुंबे आपल्या मुलांना वैद्यकीयमहाविद्यालयात किंवा आयआयटीमध्ये पाठवण्याचेस्वप्न पाहतात. त्याग करण्यास तयार असतात. कोचिंगसंस्थांची फी आणि मुलांच्या राहणीमानाचा खर्चभागवण्यासाठी ते आयुष्यभराची बचत पणालालावतात. अनेकदा ते दुसऱ्या मुलांच्या लग्नाला विलंबकरतात, अगदी स्वतःच्या उपचारांनाही पुढे ढकलतात.कारण त्यांना आशा असते की, त्यांची मुले एक दिवसपात्र डॉक्टर, अभियंता बनतील किंवा प्रतिष्ठित नोकरीमिळवतील. सरकारी संस्थांमधील अभियांत्रिकी आणिवैद्यकीय शिक्षणासारख्या प्रमुख व्यावसायिकअभ्यासक्रमांच्या परीक्षा केंद्रीकृत पद्धतीने घेण्यासाठी2018 मध्ये एनटीएची स्थापना झाली होती. एनटीएतर्फेआयआयटीसाठी जेईई (मेन), नीट-यूजी,सीयूईटी-यूजी, यूजीसी-नेट आणि सीएसआयआर-नेटयांसारख्या परीक्षा घेतल्या जातात. मात्र, प्रश्नपत्रिकाफुटी आणि परीक्षा रद्द होण्याच्या वादांमुळे तिची प्रतिमासातत्याने मलिन होत आहे. शिक्षण मंत्रालयाने 2024मध्ये संसदेत दिलेल्या माहितीनुसार एनटीएने 240परीक्षा यशस्वीपणे घेतल्या होत्या. मात्र, त्याचकालावधीत प्रतिष्ठित पदे आणि प्रवेशांशी संबंधितकिमान 16 महत्त्वाच्या परीक्षा स्थगित कराव्या लागल्याहोत्या. 2025 मध्ये शिक्षणविषयक संसदीय स्थायीसमितीने नमूद केले की, 2024-25 या कालावधीतएनटीएने घेतलेल्या 14 स्पर्धा परीक्षांपैकी किमान पाचपरीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटी आणि निकाल प्रक्रियेतीलत्रुटींसारख्या गंभीर समस्या आढळल्या. सर्वात गंभीर बाब म्हणजे नीट-यूजी प्रथमच अशाघोटाळ्यात अडकलेली नाही. 2024 मध्येहीप्रश्नपत्रिका फुटली होती. त्या वर्षी हे प्रकरण सर्वोच्चन्यायालयात गेले होते. न्यायालयाने प्रश्नपत्रिकाफुटल्याचे मान्य केले होते, मात्र पुनर्परीक्षेमुळेविद्यार्थ्यांवर मोठा ताण येईल, असे सांगत परीक्षा रद्दकरण्यास नकार दिला होता. प्रश्नपत्रिका फुटी आणिइतर समस्या सातत्याने एनटीएच्याच मागे का लागल्याआहेत, याचे उत्तर शिक्षण मंत्रालयाने द्यायला हवे. कारणएनटीएतर्फे न घेतल्या जाणाऱ्या सीबीएसई आणियूपीएससीसारख्या परीक्षा बहुतांश वेळा अशासमस्यांपासून दूर राहिलेल्या दिसतात. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) युवकांना समान संधी देणारी पारदर्शकव्यवस्था असावी, अशी धारणाअसलेल्या परीक्षा प्रणालीच्याविश्वासार्हतेलाच मोठा धक्का बसलाआहे. वारंवार निराशा करणाऱ्या संस्थेवरलोकांनी अखेर किती काळ विश्वासठेवायचा?
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



