देशात विद्यार्थी आंदोलनांच्या रूपाने सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. युवकांचे आंदोलन दिल्लीपुरते मर्यादित न राहता देशातील अनेक शहरांत पसरले आहे. इतिहासाचा मागोवा घेतला तर विद्यार्थी आंदोलने अनेकदा सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरली आहेत. 1973 मध्ये गुजरातमधील मोरबी महाविद्यालयात भोजनालयाच्या शुल्कवाढीविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन अल्पावधीतच देशव्यापी जनआंदोलनात रूपांतरित झाले. या आंदोलनामुळे दोन मुख्यमंत्र्यांना पद सोडावे लागले, आणीबाणीच्या घोषणेची पार्श्वभूमी तयार झाली आणि अखेरीस 1977 मध्ये इंदिरा गांधी यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या राजकीय उलथापालथीची प्रक्रिया सुरू झाली. इतिहासातील दोन घटना कधीच तंतोतंत सारख्या नसतात. त्यामुळे सध्याचे आंदोलन कोणत्या दिशेने जाईल, याबाबत आताच निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. आज रस्त्यावर उतरलेल्या युवकांच्या संतापाकडे दुर्लक्ष झाले. त्यावर तातडीने व प्रभावी उपाय केले नाहीत, तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, याचा सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. डिसेंबर 1973 मध्ये मोरबी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर 40 विद्यार्थ्यांना निलंबित केले गेले. महाविद्यालय अनिश्चित काळासाठी बंद ठेवावे लागले. काही दिवसांतच अहमदाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातही आंदोलन सुरू झाले. जानेवारी 1974 पर्यंत गुजरात विद्यापीठातील विद्यार्थीही आंदोलनात सहभागी झाले. राज्यभरातील विद्यार्थी संघटनांनी तीन दिवसांच्या संपाची हाक दिली. महागाई,भ्रष्टाचाराने आधीच नाराज मध्यमवर्गही आंदोलनात सहभागी झाला. विविध स्थानिक आंदोलने एकत्र येऊन नवनिर्माण समितीच्या नेतृत्वाखाली उभी राहिली. या समितीने व्यवस्थेत व बदलांची मागणी केली. मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांना राजीनामा द्यावा लागला. गुजरात विधानसभा बरखास्त केली. नव्याने निवडणुका घेण्यात आल्या. काँग्रेसचे (ओ) ज्येष्ठ नेते मोरारजी देसाई यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी)ही या आंदोलनात सहभागी झाली होती. या आंदोलनामुळे राज्यात जनसंघ (भाजपचे पूर्वरूप) बळकट होण्यास मोठी मदत झाली. सुरुवातीला जनसंघ बिगर काँग्रेस आघाड्यांचा भाग बनला . अखेरीस 1995 मध्ये भाजपने स्वतःच्या बळावर गुजरातमध्ये सत्ता मिळवली. त्यानंतर आजपर्यंत पक्ष सत्तेबाहेर गेलेला नाही. 1974 मध्ये जयप्रकाश नारायण गुजरातमध्ये आले. तेथील आंदोलनातून प्रेरणा घेऊन त्यांनी बिहारमध्ये काँग्रेस सरकारविरोधात व्यापक आंदोलन उभे केले. त्यात लालू यादव आणि नितीश कुमार यांसारखे युवा विद्यार्थी नेते सहभागी झाले. पुढील अनेक दशकांपर्यंत त्यांनी बिहारच्या राजकारणात वर्चस्व राखले. अखेरीस मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांचे सरकारही सत्तेबाहेर गेले. मात्र, त्याहून महत्त्वाचे म्हणजे हे आंदोलन गुजरात,बिहारच्या सीमांपलीकडे जाऊन केंद्र सरकारविरोधातील व्यापक जनआंदोलन बनले. त्याच काळात जेपी यांनी ‘संपूर्ण क्रांती’ची घोषणा दिली. सुरुवातीला जंतर-मंतरवरील आंदोलन आणि त्यानंतर लडाखचे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सहभागानंतरही हे आंदोलन फार प्रभाव न टाकता संपेल, असे अनेकांना वाटत होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आयोजित ‘संसद चलो’ मोर्चात दिल्लीच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात लोक उतरले. त्यानंतर या आंदोलनात विद्यार्थीच नव्हे, तर इतर अनेक घटक सहभागी झाले. मुलांच्या भवितव्याची चिंता असलेले पालक, उच्च शिक्षणाच्या संधींबाबत चिंतित शालेय विद्यार्थी, युवकांना पाठिंबा देणारे ज्येष्ठ नागरिक, ऑटोचालक, बेरोजगार तरुण, विविध सामाजिक स्तरांतील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले. हे आंदोलन अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्याला अजून स्पष्ट, संघटित स्वरूप मिळायचे आहे. या आंदोलनाला स्वतःचा ‘जेपी’ मिळालेला नाही. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होण्यापूर्वी परिस्थिती हाताळण्याची संधी सरकारकडे आहे. इतिहासातून एखादा धडा घ्यायचा असेल, तर जनतेच्या संतापाकडे दुर्लक्ष करणे ही राजकीयदृष्ट्या शहाणपणाची बाब ठरत नाही. ( हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) इतिहासातून धडा घेणे महत्त्वाचे...1974 मध्ये जयप्रकाश नारायण गुजरातेत आले होते. तेथील नवनिर्माण आंदोलनातून प्रेरणा घेत त्यांनी बिहारमध्ये काँग्रेस सरकारविरोधात आंदोलन केले. त्यात लालू यादव , नितीश कुमार यांसारखे विद्यार्थी नेते तयार होऊन त्यांनी बिहार राजकारणावर प्रभाव गाजवला.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- पुणे: पंतप्रधान मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा! मनसे नेते अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचे नेते सिद्धेश कदम यांची घणाघाती टीका
महाराष्ट्र
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- जालना: मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला! मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात उद्या जालना, बीड, परभणी आणि लातूर कडकडीत बंद; काय सुरू आणि काय राहणार बंद?
गुन्हा
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात


























Subscribe to my channel




