मुंबई: दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा आणि २० जुलै रोजी झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी मुंबईतही तरुणाई मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरली. मुसळधार पावसाची पर्वा न करता दादर येथील शिवाजी पार्क आणि चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात शेकडो विद्यार्थी, तरुण आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आले होते. हातात निषेधाचे फलक, गुलाबाची फुले आणि चॉकलेट घेऊन त्यांनी शांततापूर्ण आंदोलन करत केंद्र सरकार आणि पोलिस कारवाईविरोधात आवाज उठवला.
मात्र, जमावबंदीच्या आदेशानंतरही तरुणाई रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली. अशातच आंदोलकांना वैताگलेल्या पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
नेमका प्रकार काय?
व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, मुंबई पोलिसांनी काही विद्यार्थ्या्मना ताब्यात घेऊन आपल्या पोलीस वाहनात बसवले होते. त्यानंतर समोरील सीटवर बसलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने त्या विद्यार्थ्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलचा कॅमेरा सुरू करून हा सर्व प्रकार रेकॉर्ड केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले नाही.
या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी म्हणताना दिसत आहे की, "परत जर या परिसरात दिसलात तर माझ्यासारखा बेकार माणूस नाही. नाहीतर मी खिशात ५०-५० ग्रॅम पावडर टाकेन, मग जामीनही मिळणार नाही. तुम्हा लोकांमुळे सध्या आम्हाला त्रास होत आहे."
राजकीय वर्तुळात संताप आणि तीव्र पडसाद
पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना थेट खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची आणि आयुष्य उद्धवस्त करण्याची धमकी दिल्याचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी आणि विरोधकांनी या प्रकारावरून पोलीस प्रशासन व सरकारवर कडाडून टीका केली आहे. हा केवळ विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न नसून लोकशाही अधिकारांवर थेट हल्ला असल्याचे सांगत विरोधकांनी या कृत्याचा निषेध केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुंबई पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची सत्यता आणि त्यामागील परिस्थितीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी अहवाल समोर आल्यानंतरच यावर अधिकृत कारवाई स्पष्ट होईल.
शहर
- पुणे: संतापजनक प्रकार चालत्या रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरसह थेट रस्त्यावर कोसळला बेघर रुग्ण; सुरक्षेचा फज्जा उडाल्याने खळबळ!
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
महाराष्ट्र
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!

























Subscribe to my channel



