चंद्रपूर: "पोहायला गेला अन् परतलाच नाही; १६ वर्षांच्या विद्यार्थ्याचा नहरात बुडून दुर्दैवी अंत."

चंद्रपूर: रमाबाई आंबेडकर विद्यालयातील इयत्ता दहावीचा विद्यार्थी नैतिक विठ्ठल शेडमाके (वय १६), याचा आसोलामेंढा नहरात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी त्याचा मृतदेह नहरात सापडला.

सोमवारी सायंकाळी ६ वाजता नैतिक आपल्या दोन मित्रांसोबत पोहण्यासाठी आसोलामेंढा नहरावर गेला होता.पोहताना पाण्याच्या वेगवान प्रवाहात नैतिकचा अंदाज चुकला आणि तो पाण्यात अडकला. मित्रांच्या डोळ्यादेखत तो गटांगळ्या खात नहराच्या खोल प्रवाहात वाहून गेला. घडलेला हा प्रकार पाहून त्याचे मित्र प्रचंड घाबरले, त्यामुळे त्यांनी कोणालाही काहीही न सांगता घरी परतणे पसंत केले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत नैतिक घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आणि त्यांनी त्याचा सर्वत्र शोध सुरू केला.

 

 

मंगळवारी सकाळी जेव्हा नैतिकच्या मित्रांनी घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला, तेव्हा एकच खळबळ उडाली. त्यानंतर ग्रामस्थ, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने नहराच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर सायंकाळच्या सुमारास भवराळाजवळील नहरात नैतिकचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, एका तरुण विद्यार्थ्याचा नाहक जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *