दिवसभरच्या धावपळीनंतर शेवटी संध्याकाळी, रात्री लक्षात येतं की आज फक्त ओढाताणच आपल्या पदरी पडली. अंथरुणावर पडल्यावर ही झोप लागत नाही. अनेक लोकांना तर झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. काहीजण व्यसनाच्या आहारी जातात. प्रत्येक जण दिवसभर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवत नाही की सगळी धावपळ, ओढाताण कशासाठी चालू आहे? दिवसभर आपण व्यवहाराकडे लक्ष देत असतो. एकावेळी अनेक कामं,अनेक व्यवहार असतात. काही गोष्टी काही व्यवहार आपल्या हातातले नसतात,आपल्या आटोक्यातले नसतात. ते पार पाडताना ताणतणाव होतो. हे सर्व अखेर कशासाठी चालू आहे? कोणत्या प्राप्तीसाठी चालू आहे? याचा विचार मात्र केलेला नसतो. बहुतांशी नेमकी हीच चूक घडते की भौतिकतेच्या आहारी गेलेला मनुष्य साधनांना साध्य समजत आहे. प्रगती सोबत स्थिरता तणाव मुक्ती शांतता आंतरिक शांती हे साध्य आहे. यासाठी जी मेहनत करायची ती साधना. परंतु साधनापर्यंतच अडकत गेल्यामुळे साध्या पर्यंत पोहोचता येत नाही आणि परिणामी तो करणारा म्हणजे साधक हा अस्थिर, तणावग्रस्त, चिंताग्रस्त असाच असतो आणि दिसतो. आज जगात वावरत असलेल्या किती लोकांना याची जाणीव आहे की जीवनाचा प्रमुख उद्देश शांती आणि स्थिरता आहे. ही शांती आणि स्थिरता मिळवण्यासाठी दिवसभराचे सगळे व्यवहार,धावपळ आणि उठाठेव करायची असते. सकाळी उठल्याबरोबर आपण साधारणपणे न बोलता दिवसभराची कामे मनात ठरवतो. ती कशाप्रकारे करायची याची आखणी करतो. आणि ते सर्व करत असताना काही पूर्ण होतात तर काही ना अडचणी येतात. असाच दिवस निघून जातो आणि शेवटी आपण थकलो आहोत, तणावग्रस्त आहोत,अत्यंत अस्थिर अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीने झोपतो. आपल्या नियोजनामध्ये सगळी कामं असतात परंतु स्थिरता आणि शांतीचे नियमन नसते. कुठे थांबायचे, केव्हा थांबायचे हे निश्चित नसते. सगळी कार्य पार पाडत असताना मनाला शांतता केव्हा लाभली आणि वास्तविक जगण्याचा आनंद काही मिळाला का हे आपण तपासलेले नसते. जन्माला येणे आणि मागे नाव लौकिक न ठेवता केवळ कष्टात आयुष्य कंठून एके दिवशी मरणे याला जीवन जगणे असे म्हणत नाहीत. तसेच दिवस उजाडला, धावपळ, पळापळी कष्ट सुरू झाली आणि त्यामध्येच दिवसाचा शेवट झाला हा ही दिवसाचा निरर्थक वाईट अंत आहे. म्हणून रोजच्या दिवशी दररोजच्या कामात जशी काम करायची पद्धत ठरवलेली असते त्यातच हे विसरायला नको हे सर्व धावपळ सर्व मेहनत ही स्थिरता आणि शांती लाभावी यासाठी आहे. म्हणून कुठेतरी थांबणे मनाला समजूत घालून घेणे आणि खरोखर खऱ्या अर्थाने जगणे महत्त्वाचे ठरते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




