चंद्रपूर: 'पप्पा, देवांशला का मारले, मला का मारताय?...' अवघ्या १२ वर्षाच्या रुषांतचा हा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश आणि रक्ताने माखलेल्या हातांनी बापाला दिलेला धक्का.. या प्रसंगावधानामुळेच शक्तीनगर येथील नराधम बापाच्या तावडीतून रुषांतचा जीत थोडक्यात वाचला! अन्यथा निष्पाप ७ वर्षांच्या देवांशप्रमाणेच त्याच्याही आयुष्याची ज्योत त्या निर्दयी बापाने विझवली असती. दुर्गापूर शक्तीनगर येथील पोटच्या दोन गोळ्यांवर जन्मदात्यानेच केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेत आता काळीज पिळवटून टाकणारे नवे खुलासे समोर आले आहेत.
कौटुंबिक वादातून आरोपी मंगेश बदखल याची पत्नी गेल्या सात महिन्यांपासून वेगळी राहत होती. रविवारी मंगेशने तिला परत आणण्यासाठी मनधरणी केली, मात्र तिने येण्यास नकार दिला. याच नैराश्यातून मंगेशच्या डोक्यात संपूर्ण कुटुंबच संपवण्याचा क्रूर कट शिजला. सोमवारी सायंकाळी त्याने दुकानातून नवीन ब्लेड खरेदी केले. घरात दोन्ही मुलांना बोलावून आधी निष्पाप देवांशची मान वर केली आणि त्याच्या गळ्यावर एकापाठोपाठ दोन धारधार ब्लेडने वार केले. देवांश रक्ताच्या थारोळ्यात तडफडून खाली कोसळला.
धाकट्या भावाचा डोळ्यांसमोर पडलेला मृतदेह पाहून १२ वर्षाचा रुषांत सुन्न झाला. तेवढ्यात रक्ताने माखलेल्या नराधम बापाने नवीन ब्लेड काढून रुषांतच्याही गळ्यावर फिरवला. दरम्यान रुषांतने कमालीचे प्रसंगावधान दाखवले. "पप्पा, मला का मारताय? देवांशला का मारले?" असा आक्रोश करत त्याने नराधम बापाचा हात जोरात झटकून चपळतेने शेजारच्या खोलीत जाऊन आतून दार बंद करून घेतले. रुषांत गळ्यातून रक्त वाहू लागल्याने, तोही मरेल या आशेने मंगेशने स्वतः गळफास घेण्याचा प्रयत्न केला. इतक्यात त्याचा लहान भाऊ घरी आला आणि हा भीषण प्रकार उघडकीस आला. त्याने तातडीने दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल केले, परंतु दुर्दैवाने देवांशचा आधीच मृत्यू झाला होता. तर रुषांतवर वेळेत उपचार सुरू झाल्याने त्याचे प्राण वाचले. दुर्गापूरचे पोलिस निरीक्षक संतोष शेगोकर यांनी सोमवारी सायंकाळी अटक करुन मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली
रुषांतच्या गळ्यावर तब्बल ९ टाके
बापाशी झालेल्या झटापटीत रुषांतच्या गळ्यावर गंभीर दुखापत झाली असून त्याच्या मानेवर तब्बल ९ टाके पडले आहेत. सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. गुन्ह्यात वापरलेले धारदार ब्लेड जप्त केले असून, आरोपीच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग, घटनास्थळावरील रक्ताचे जखमी नमुने आणि डीएनए सॅम्पल्स फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येत असल्याचे दुर्गापूरचे पोलिस निरीक्षक संतोष शेगोकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
मानसिकतेची जुनी मुळे; वरोऱ्यात दाखल होता ३७६ चा गुन्हा
नराधम मंगेश बदखल हा विकृत अन् क्रूर मानसिकतेचा असल्याचे तपासात समोर आले आहे. ७ वर्षांपूर्वी त्याच्याविरुद्ध वरोरा पोलिस ठाण्यात बलात्काराप्रकरणी कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल झाला होता, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




