
Pune : पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर रस्त्याच्या कडेला पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून इको कारची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोन महिला आणि एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत तिघे जखमी झाले. हा अपघात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डाळज नं. २ (ता. इंदापूर) येथे गुरुवारी (दि. २६) सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.
मायलेकासह तिघांचा मृत्यू
या अपघातात अदिती अमर हातेकर (वय २५) आणि त्यांच्या मुलगा जय अमर हातेकर (वय दोन) आणि सखूबाई ईश्वर गेजगे (वय ६०, सर्व रा. सांगोला, जि. सोलापूर) हे अपघातात जागीच ठार झाले.
इको गाडीवरील चालक कबीरदास ईश्वर गेजगे (५०, रा. पाटस, ता. दौंड) हे गंभीर जखमी झाले. त्यांची पत्नी स्वाती गेजगे (३४) आणि मुलगी समृद्धी गेजगे (१० महिने) किरकोळ जखमी झाल्या. रात्री उशिरापर्यंत भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. महामार्गावरील नादुरुस्त मालवाहतूक वाहने तत्काळ हटवण्याची मागणी या निमित्ताने होत आहे.
कसा झाला अपघात?
अपघाताबाबत सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी माहिती दिली. टायर पंक्चर झालेला आयशर टेम्पो धोकादायक स्थितीत महामार्गाच्या बाजूला उभा होता. त्या वेळी इको कारच्या चालकाने आयशर टेम्पोला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात इको गाडीचे प्रचंड नुकसान झाले. भिगवण पोलिसांनी जखमींना गाडीतून बाहेर काढण्यास मदत केली. अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला होता.
केमिकल टँकरचा भीषण अपघात
दुसरीकडे, मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघाताची घटना ताजी असतानाच सुरत-नागपूर महामार्गावर केमिकलने भरलेल्या एका टँकरचा भीषण अपघात होऊन आग लागल्याची घटना घडली. टँकरने रस्त्याच्या दुभाजकाला धडक दिल्याने हा पेट घेतला आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला. या घटनेमुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणाजवळ गुरुवारी दुपारी ही घटना घडली.
केमिकलने भरलेला हा टँकर साक्रीहून धुळ्याच्या दिशेने जात होता. चालकाचा ताबा सुटल्याने टँकर थेट दुभाजकाला जाऊन धडकला. धडक इतकी भीषण होती की टँकरने त्वरित पेट घेतला. काही क्षणांतच केमिकलमुळे टँकरचा मोठा स्फोट झाला, ज्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. टँकरने पेट घेताच चालक आणि क्लिनरने प्रसंगावधान राखत चालत्या टँकरमधून उड्या घेतल्या, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यावर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
शहर
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
महाराष्ट्र
- हिंगोली: सोयाबीन पिकाची नासाडी डोळ्यांसमोर पाहून वसमतमधील ६० वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- सातारा: कराडला 'ऑक्टोबर हीट'चा प्रचंड तडाखा! वाढत्या उकाड्याने नागरिक घामाघूम, तर कडक उन्हामुळे रस्त्यांवरील वर्दळ थंडावली
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगावर धडकण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधींचा 'गनिमी कावा'आकाशवाणी भवनात ठिय्या आणि राजकीय संघर्ष शिगेला
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
गुन्हा
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान






















Subscribe to my channel


