जम्मू-काश्मीर: एक अत्यंत खळबळजनक आणि मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीर पुन्हा एकदा भीषण दहशतवादी हल्ल्याने हादरले असून, दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील केल्लम परिसरात दहशतवाद्यांनी अत्यंत निर्दयीपणे बिगर-काश्मिरी मजुरांना लक्ष्य केले आहे. या भ्याड हल्ल्यामध्ये छत्तीसगडवरून रोजगारसाठी आलेल्या दोन परप्रानतीय मजुरांचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, कुलगाममधील केल्लम परिसरातील एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांवर अज्ञात दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये दीपक आणि भूपिंदर अशी दोन्ही मजुरांची नावे असून ते मूळचे छत्तीसगड राज्यातील राहणारे आहेत. हल्ल्यादरम्यान एका मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या मजुराला तत्काळ उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अनंतनाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
या अत्यंत निंदनीय आणि हल्ल्यानंतर दहशतवादी संघटनेने आपली क्रूरता दाखवत या कृत्याची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रतिबंधित दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तैयबा'ची प्रॉक्सी संघटना असलेल्या 'द रेजिस्टेंस फ्रंट' (TRF) ने या हल्ल्यामागे आपला हात असल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
हल्ल्याची तीव्रता लक्षात घेता भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे संपूर्ण परिसराला चोहोबाजूने वेढा घातला आहे. दहशतवाद्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी संपूर्ण भागात व्यापक प्रमाणात कडक सर्च ऑपरेशन आणि घराघरांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून, दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सुरक्षा दलांना आणखी आक्रमकपणे मोहीम राबवण्याचे कडक निर्देश दिले आहेत. निरपराध मजुरांवर झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र शोककळा पसरली आहे.
शहर
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- पुणे: अमित शाहांच्या पुणे दौऱ्यादरम्यान खळबळ; ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत मोरे पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: सदाशिव पेठेत पोलिसांच्या भरधाव व्हॅनचा थरार; चार-पाच वाहनांना उडवले, विश्रामबाग पोलिसांकडून चालक ताब्यात
- नागपूर: भरचौकात मारहाण करून युवकांचे अपहरण; पोलिसांच्या 'सिनेस्टाइल ॲक्शन'मुळे आरोपींची पळापळ
महाराष्ट्र
- गडचिरोली: भामरागडला महाप्रलयाचा विळखा; ३०० हून अधिक घरांमध्ये पाणी, वीज आणि मोबाईल सेवा सलग दोन दिवसांपासून ठप्प
- कोल्हापूर: पाटगावमधील शिवाजीनगर कॉलनीत गॅस सिलिंडरचा स्फोट; दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी
- सातारा: आजीच्या मागे धावणाऱ्या चिमुकड्यावर काळाचा घाला; सातारा तालुक्यातील अजोली-लिंब येथे उघड्या नाल्यात पडून बालकाचा मृत्यू
- पुणे: डिंभे धरणातून १०,४३८ क्युसेक पाण्याचा विसर्ग; घोद नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
गुन्हा
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- वाशिम: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकराकडून निर्घृण हत्या; दारू पाजून दोरीने गळा आवळत केला गेम
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये माजी सरकारी बस चालकाच्या घरी पोलिसांची धाड, २८ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ





























Subscribe to my channel



