सरकारी कर्मचाऱ्यांकडून सोशल मीडियाचा वाढता आणि अवाच्य वापर तसेच गोपनीय माहिती लीक होण्याचे प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागामार्फत राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी व बाह्यस्रोताद्वारे नियुक्त कर्मचारी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे आणि महामंडळांमधील सर्व कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाच्या वापराबाबत एक नवी आणि कडक आचारसंहिता (नियमावली) लागू करण्यात आली आहे. प्रशासकीय शिस्त आणि गोपनीयता कायम राखण्याच्या दृष्टीने ही नियमावली अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
नव्या नियमांनुसार प्रमुख निर्बंध आणि आचारसंहिता
१. सरकारच्या धोरणांवर टीका करण्यास सक्त मनाई: राज्य किंवा केंद्र सरकारच्या विद्यमान अथवा अलीकडील धोरणांवर, निर्णयांवर किंवा राजकीय घडामोडींवर कोणत्याही प्रकारची प्रतिकूल टिप्पणी किंवा टीका करण्यास सरकारी कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे मज्जाव करण्यात आला आहे.
२. वैयक्तिक आणि कार्यालयीन खाती स्वतंत्र ठेवणे बंधनकारक: कर्मचाऱ्यांनी आपली वैयक्तिक आणि कार्यालयीन सोशल मीडिया खाती पूर्णपणे वेगळी ठेवणे आवश्यक आहे. वैयक्तिक खात्यावर शासकीय पदनाम (Designation), विभागाचा लोगो, शासकीय गणवेश (वर्दी), सरकारी वाहने किंवा शासकीय इमारतींचा वापर करून कोणतेही फोटो, व्हिडिओ किंवा रील्स पोस्ट करण्यास सक्त प्रतिबंध करण्यात आला आहे.
३. गोपनीय कागदपत्रे शेअर करण्यास बंदी: सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज, शासकीय कागदपत्रे किंवा संवेदनशील माहिती सोशल मीडियावर प्रसारित करता येणार नाही. तसेच स्वतःची प्रसिद्धी किंवा स्वयंप्रशंसा होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
४. आक्षेपार्ह व द्वेषमूलक मजकुरावर बंदी: समाजात तेढ निर्माण करणारा, द्वेषमूलक, मानहानीकारक किंवा आक्षेपार्ह स्वरूपाचा कोणताही मजकूर, पोस्ट किंवा कमेंट सोशल मीडियावर शेअर किंवा फॉरवर्ड करण्यास सक्त मनाई आहे.
मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर आणि शिस्तभंगाची कारवाई
शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार, जनजागृती आणि कार्यालयीन समन्वयासाठी व्हॉट्सॲप (WhatsApp) आणि टेलिग्राम यांसारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा अधिकृत वापर करता येणार आहे. मात्र, केंद्र किंवा राज्य सरकारने बंदी घातलेल्या कोणत्याही मोबाईल ॲप्सचा किंवा संकेतस्थळांचा वापर करण्यास परवानगी असणार नाही.
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, 'महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९' हे सोशल मीडियावरील वर्तनालाही लागू राहतील. या नव्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर 'महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९' अंतर्गत अत्यंत कडक शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा कडक इशाराही शासनाकडून देण्यात आला आहे.
शहर
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
महाराष्ट्र
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
गुन्हा
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!























Subscribe to my channel




