नाशिक: नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून नाशिक शहर आणि परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान शहरातील मुख्य ठिकाणांसह मालेगाव परिसरातील विविध अन्न आस्थापनांवर धाडी टाकून तब्बल १९ लाख ९४ हजार ४८६ रुपये किमतीचा संशयास्पद, भेसळयुक्त व प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.
या मोहिमेत नाशिक शहरातील कारवायांना प्राधान्य देत पथकाने विशेष पावले उचलली. चौक मंडई, जुने नाशिक येथील 'मेसर्स भारत जनरल स्टोअर'वर कारवाई करून १ लाख १ हजार ७२६ रुपये किमतीचे प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून संबंधित दुकान सील करण्यात आले आहे. तसेच आडगाव येथील जत्रा हॉटेल परिसरातील 'मेसर्स स्वागतम स्वीट्स' येथून ५ हजार ७६० रुपये किमतीचे ९ किलो निकृष्ट व भेसळयुक्त संशयित गायीचे तूप जप्त करण्यात आले.
नाशिक शहराव्यतिरिक्त मालेगाव तालुक्यातही दोन मोठ्या जप्ती करण्यात आल्या. चंदनपुरी शिवार येथील 'मेसर्स श्रीराम एंटरप्रायझेस' येथून विनापरवाना उत्पादन, विक्री बिल नसणे आणि भेसळीच्या संशयावरून १७ लाख २७ हजार रुपये किमतीचा सैल स्वरूपातील रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आले. तर कल्ली कुट्टी येथील 'मेसर्स ए-वन ताज बेकरी' वर अत्यंत अस्वच्छ वातावरणात आणि विनापरवाना व्यवसाय चालवला जात असल्याने कारवाई करण्यात आली. तेथून १ लाख ६० हजार रुपये किमतीचा चारशे किलो टोस्ट जप्त करून बेकरीला 'व्यवसाय बंद' ची नोटीस बजावण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यावसायिकाची गय केली जाणार नाही आणि भविष्यातही अशा कारवाया अधिक तीव्रतेने सुरूच राहतील, असा सज्जड इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
जप्त मुद्देमाल तपशील:
भारत जनरल स्टोअर, जुने नाशिक: प्रतिबंधित अन्नपदार्थ - १ लाख १ हजार ७२६ रुपये
स्वागतम स्वीट्स, आडगाव, नाशिक: गायीचे तूप (९ किलो) - ५ हजार ७६० रुपये
श्रीराम एंटरप्रायझेस, मालेगाव: रिफाइंड सोयाबीन तेल - १७ लाख २७ हजार रुपये
ए-वन ताज बेकरी, मालेगाव: टोस्ट (४०० किलो) - १ लाख ६० हजार रुपये
एकूण एकत्रित जप्त माल: १९ लाख ९४ हजार ४८६ रुपये
शहर
- छत्रपती संभाजीनगर: आयपीएस बोलत असल्याचं भासवलं, अटक करण्याची भीती दाखवत ६९ वर्षीय वृद्धेला १२ लाखांनी गंडवलं!
- छत्रपती संभाजीनगर: मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला
- पुणे: चेहऱ्यावरील फोडांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; चाकण परिसरातील घटनेने परिसरात शोककळा
- पुणे: मावळात मोठा अनर्थ टळला; काळे येथे रस्ता खचल्याने कार थेट शेतात उलटली, धोकादायक रस्त्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला
महाराष्ट्र
- पुणे: वीर धरण १०० टक्के भरले; १५,०११ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली, बळीराज्यात आनंदाचे वातावरण
- छत्रपती संभाजीनगर: आयपीएस बोलत असल्याचं भासवलं, अटक करण्याची भीती दाखवत ६९ वर्षीय वृद्धेला १२ लाखांनी गंडवलं!
- छत्रपती संभाजीनगर: मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला
- पुणे: चेहऱ्यावरील फोडांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; चाकण परिसरातील घटनेने परिसरात शोककळा
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला
- पुणे: चेहऱ्यावरील फोडांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; चाकण परिसरातील घटनेने परिसरात शोककळा
- छ.संभाजीनगर: प्रसिद्ध 'उत्तम उपहार गृह'वर FDA चा छापा, हॉटेलात पाय टाकताच नको ते दिसलं, परवाना रद्द!
- कोल्हापुरात खळबळ! गळ्याभोवती नायलॉनची दोरी अन् डोके-चेहऱ्यावर गंभीर घाव; गिरगाव पाळकोबा डोंगरात रिक्षाचालकाचा निर्घृण खून
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्लीतील student protest चे पुणे कनेक्शन! 'कॉकरोच जनता पार्टी'चा शनिवारवाड्यातून आक्रमक मोर्चा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अन् वाहतुकीत बदल"
- तेलंगणा: खेळता-खेळता मोबाईलची बॅटरी तोंडात धरली अन् झाला भीषण स्फोट; १२ वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत
- जंतर-मंतरवरील NEET आंदोलन: "माझा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार इथेच करा!" अकोल्याचे ७८ वर्षीय एमबीबीएस डॉक्टर विद्यार्थ्यांच्या पाठीशी, व्हिडिओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात























Subscribe to my channel




