बीड: जिल्ह्यात प्रशासनाच्या नाकाखाली सर्रास सुरू असलेली बेकायदा व बेफाम वाळू वाहतूक पुन्हा एकदा एका निष्पाप बळीराजाच्या जीवावर बेतली आहे. शेतातील पिकाला घालण्यासाठी केज शहरात खत खरेदी करायला आलेल्या एका ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याला वाळूने भरलेल्या बेभान टिप्परने अमानुषपणे चिरडले. हा भीषण आणि काळीज पिळवटून टाकणारा अपघात केज शहरातील गजबजलेल्या 'श्री जय भवानी चौकात' गुरुवारी, २३ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजेच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत शेतकऱ्याच्या शरीराचा अक्षरशः चेंदाधेंदा होऊन त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
माजलगावहून वाळू घेऊन येणाऱ्या सुसाट टिप्परची धडक
अपघाताची सविस्तर माहिती अशी की, धारूर येथील खडीमशीन चालक सुभाष शरद गायकवाड यांच्या मालकीचे एक टिप्पर (क्रमांक MH 44 U 9971) माजलगाव तालुक्यातील गोदावरी (गंगा) नदीच्या पात्रातून वाळू भरून केज शहराच्या दिशेने येत होते. हे टिप्पर केज येथील श्री जय भवानी चौकातील तीव्र उतारावरून भरधाव वेगाने जात असताना, तांबवा येथील रहिवासी शेतकरी नितीन आदिनाथ चाटे (वय ३५ वर्षे) हे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक GA 03 AA 8128) खत खरेदीसाठी जात होते. याच वेळी उतारावर सुसाट असलेल्या टिप्परच्या मागील डाव्या चाकाखाली त्यांची दुचाकी अचानक आल्याने हा भीषण अपघात झाला. चाकाखाली चिरडल्या गेल्याने नितीन चाटे यांचा जागीच करुण अंत झाला.
पावसाने उघडीप दिल्याने खत नेण्यास आले होते शेतकरी
केज तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस झाल्यानंतर गुरुवारी सकाळी पावसाने काहीशी उघडीप दिली होती. यामुळे पिकांना खताचा डोस देण्यासाठी नितीन चाटे हे मोठ्या आशेने व अपेक्षेने दुचाकीवरून केज बाजारपेठेत आले होते. मात्र, काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने त्यांचे हे स्वप्न आणि संसार अर्धवटच राहिला आहे. त्यांच्या या अकस्मात जाण्याने तांबवा गावावर आणि चाटे कुटुंबावर तीव्र शोककळा पसरली आहे.
अपघात घडताच चौकात नागरिकांची मोठी गर्दी जमली. मात्र, संवेदना हरवलेले काही तरुण अपघातात छिन्नभिन्न झालेल्या पार्थिवाचे मदत करण्याऐवजी मोबाइलमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यात मग्न असल्याचे दिसून आले. ही संतापजनक बाब लक्षात येताच घटनास्थळी उपस्थित असलेले शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्याक आघाडीचे तालुका प्रमुख माजेद सय्यद आणि बनकरंजा येथील चित्रकार दुर्गादास लांब यांनी तात्काळ पुढे होत अस्ताव्यस्त पडलेल्या पार्थिवाला कापडाने झाकून मानवी संवेदना जपल्या. त्यानंतर सुमित तेलंग यांची रुग्णवाहिका बोलावून पार्थिवाचे उर्वरित अवयव केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यासाठी त्यांनी पोलिसांना मोठी मदत केली. त्यांच्या या समयसूचकतेचे व सामाजिक जाणिवांचे सर्वत्र कौतुक होत असून, याप्रकरणी पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.
शहर
- पुणे: शिवाजीनगरची वाहतूक कोंडी फोडणार; ७३.५२ कोटींच्या उड्डाणपुलाला मंजुरी, दीड वर्षांत काम पूर्ण!
- नागपूर: कॉर्पोरेट्सचा महाराष्ट्रावर मोठा विश्वास; गुजरातच्या दुप्पट सीएसआर निधी महाराष्ट्राला प्राप्त, सामाजिक विकासात राज्य अव्वल
- मुळशीत मोठी दुर्घटना टळली! सावरगाव येथे पौड-कोळवण मुख्य रस्त्यावर कोसळले भलेमोठे झाड; प्रशासनाच्या तत्परतेने अवघ्या अर्ध्या तासात वाहतूक पूर्ववत"
- छत्रपती संभाजीनगर: एफडीएचा दणका; अस्वच्छता अन् धोकादायक पुनर्वापर केलेल्या तेलामुळे प्रसिद्ध 'उत्तम उपहारगृह'चा परवाना तडकाफडकी निलंबित
महाराष्ट्र
- पुणे: शिवाजीनगरची वाहतूक कोंडी फोडणार; ७३.५२ कोटींच्या उड्डाणपुलाला मंजुरी, दीड वर्षांत काम पूर्ण!
- गोंदिया: लाडक्या भावाच्या निधनाचा तीव्र धक्का सहन न झाल्याने बहिणीचाही मृत्यू; एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर
- नागपूर: कॉर्पोरेट्सचा महाराष्ट्रावर मोठा विश्वास; गुजरातच्या दुप्पट सीएसआर निधी महाराष्ट्राला प्राप्त, सामाजिक विकासात राज्य अव्वल
- मुळशीत मोठी दुर्घटना टळली! सावरगाव येथे पौड-कोळवण मुख्य रस्त्यावर कोसळले भलेमोठे झाड; प्रशासनाच्या तत्परतेने अवघ्या अर्ध्या तासात वाहतूक पूर्ववत"
गुन्हा
- मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! अद्ययावत 'कवच ५.०' प्रणालीमुळे आता दर दोन मिनिटांनी धावणार लोकल; प्रवाशांची गर्दी आणि अपघातांची चिंता मिटणार"
- मुंबई: सायबर फसवणुकीचा पर्दाफाश, बेकायदेशीर 'म्युल' खात्याद्वारे २१ लाखांहून अधिकची उलाढाल; खातेदारासह इतरांवर गुन्हा दाखल
- मुंबई: कल्याण मध्ये अविवाहित शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश संपवलं; मृत्यूचं मोठं गूढ उकललं!
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- जंतर-मंतरवरील NEET आंदोलन: "माझा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार इथेच करा!" अकोल्याचे ७८ वर्षीय एमबीबीएस डॉक्टर विद्यार्थ्यांच्या पाठीशी, व्हिडिओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
- दिल्लीत ठाकरे ब्रदर्सची एन्ट्री! अभिजित दिपके यांच्या 'सीजेपी' विद्यार्थी आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा थेट पाठिंबा; सरकारवर जोरदार हल्लाबोल"
- बिहार: सासरा अन् सुनेच्या अनैतिक संबंधातून एकाच कुटुंबातील चार जणांचा अंत; विष प्राशन करून आणि गळफास घेत संपवले आयुष्य


























Subscribe to my channel



