पुणे: अपघातांचे सत्र सुरूच वाघोलीत क्रेनखाली सापडून महिलेचा मृत्यू, तर कात्रज बोगद्याजवळ टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

पुणे: क्रेनने धडक दिल्याने चाकाखाली सापडून पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली. या प्रकरणी क्रेन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत स्वप्नील पांडुरंग शिंदे (वय ३२, रा. हिंदवी पार्क, केसनंद रस्ता, वाघोली) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील शिंदे यांच्या पत्नी २० जुलै रोजी सकाळी वाघोली परिसरातून निघाल्या होत्या. त्यावेळी पेट्रोल पंपाजवळ क्रेनने शिंदे यांच्या पत्नीला धडक दिली. क्रेनच्या चाकाखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक देवगडे पुढील तपास करत आहेत.

कात्रज बोगद्याजवळ टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना जुन्या कात्रज बोगदा परिसरात घडली. या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लवाजी भारत वाघमारे (वय ४२, रा. बिबवेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत वाघमारे यांचा पुतण्या किरण (वय ३०) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार लवाजी वाघमारे हे मंगळवारी (दि. २१) दुपारी साडेबाराच्या सुमारास जुना कात्रज बोगदा परिसरातून निघाले होते. त्या वेळी नेकलेस पाॅइंटजवळ समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार वाघमारे यांना धडक दिली. अपघातात वाघमारे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक मारुती वाघमारे पुढील तपास करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *