नागपूर: 'स्वाईन फ्लू' (H1N1) संसर्गाचा धोका वेगाने वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणा आणि महापालिका पूर्णपणे सतर्क झाली आहे. जानेवारी २०२६ ते आतापर्यंत म्हणजेच गेल्या ७ महिन्यांत नागपुरात स्वाईन फ्लूचे एकूण २५ रुग्ण नोंदवले गेले आहेत, तर या संसर्गामुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष आणि चिंतेची बाब म्हणजे, या २५ रुग्णांपैकी तब्बल १५ रुग्ण एकट्या जुलै महिन्यातच समोर आले आहेत. या १५ रुग्णांपैकी १३ रुग्ण हे एकट्या नागपूर महानगरपालिका हद्दीतील असल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून तातडीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
परिस्थितीचे गांभीर्य व तीव्रता ओळखून नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांना आरोग्य प्रशासनाकडून सतर्कतेच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. फ्लूसारखी लक्षणे (ILI) आणि गंभीर श्वसन संसर्ग (SARI) असलेल्या रुग्णांवर विशेष व बारीक लक्ष ठेवणे, संशयित रुग्णांचे नमुने तातडीने तपासणीसाठी पाठवणे तसेच रुग्णांवर वेळेवर योग्य औषधोपचार सुरू करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाचे महत्त्वाचे आवाहन व उपाययोजना:
प्रमुख लक्षणे: ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे दिसल्यास अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नागरिकांनी परस्पर मेडिकल स्टोअरमधून औषधे आणून घेणे टाळावे.
हाय-रिस्क (उच्च धोका) गट: ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, ५ वर्षांखालील लहान बालके आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा इतर दीर्घ आजारपणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी या काळात विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या अध्यक्षखाली नुकतीच 'स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समिती'ची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन संशयित मृत्यूंच्या वैद्यकीय अहवाल व पुराव्यांची सखोल व कसून पाहणी करण्यात आली. या पाहणीनंतर, एका रुग्णाचा मृत्यू खरोखरच स्वाईन फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले, तर दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू इतर गंभीर आजारांमुळे (सहव्याधी) झाल्याचे समितीने जाहीर केले.
वाढत्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील खासगी रुग्णालयांवर कडक देखरेख ठेवली जात असून, औषधसाठा पूर्ण ठेवण्यावर आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहर
- मुंबई: एसी लोकलचे दरवाजे लॉक, ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड; कल्याण रेल्वे स्थानकावर गोंधळ
- जंतर-मंतरवरील NEET आंदोलन: "माझा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार इथेच करा!" अकोल्याचे ७८ वर्षीय एमबीबीएस डॉक्टर विद्यार्थ्यांच्या पाठीशी, व्हिडिओ व्हायरल
- मुंबई: 'खिशात ५० ग्रॅम पावडर टाकेन...'; आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसाकडून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल!
- नागपुर: विदर्भाच्या औद्योगिक विकासाला ऐतिहासिक बळ; नागपुरात महिंद्रा ग्रुपतर्फे १५ हजार कोटींचा महा-ऑटोमोबाइल प्रकल्प उभारण्यात येणार
महाराष्ट्र
- मुंबई: एसी लोकलचे दरवाजे लॉक, ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड; कल्याण रेल्वे स्थानकावर गोंधळ
- मोठी बातमी! एमपीएससीकडून तलाठीसह ५७०७ पदांसाठी गट-क संयुक्त परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध; अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि तारीख जाहीर
- नागपुर: विदर्भाच्या औद्योगिक विकासाला ऐतिहासिक बळ; नागपुरात महिंद्रा ग्रुपतर्फे १५ हजार कोटींचा महा-ऑटोमोबाइल प्रकल्प उभारण्यात येणार
- मुंबई: ठाण्यात स्मार्ट मीटरविरोधात मनसेची महावितरण कार्यालयावर धडक: सक्ती केल्यास 'मनसे स्टाइल'ने उत्तर देण्याचा इशारा!
गुन्हा
- मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! अद्ययावत 'कवच ५.०' प्रणालीमुळे आता दर दोन मिनिटांनी धावणार लोकल; प्रवाशांची गर्दी आणि अपघातांची चिंता मिटणार"
- मुंबई: सायबर फसवणुकीचा पर्दाफाश, बेकायदेशीर 'म्युल' खात्याद्वारे २१ लाखांहून अधिकची उलाढाल; खातेदारासह इतरांवर गुन्हा दाखल
- मुंबई: कल्याण मध्ये अविवाहित शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश संपवलं; मृत्यूचं मोठं गूढ उकललं!
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
- दिल्लीत ठाकरे ब्रदर्सची एन्ट्री! अभिजित दिपके यांच्या 'सीजेपी' विद्यार्थी आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा थेट पाठिंबा; सरकारवर जोरदार हल्लाबोल"
- बिहार: सासरा अन् सुनेच्या अनैतिक संबंधातून एकाच कुटुंबातील चार जणांचा अंत; विष प्राशन करून आणि गळफास घेत संपवले आयुष्य
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'


























Subscribe to my channel

