रायगड: मुसळधार पावसाचा तडाखा, प्रसिद्ध कलावंतीन दुर्गाच्या सुळक्याचा काही भाग खचला; प्रशासनाकडून ट्रेकिंगवर तात्काळ बंदी

रायगड: पर्यटनासाठी अत्यंत प्रसिद्ध आणि साहसी मानल्या जाणाऱ्या कलावंतीन दुर्गाबाबत (Kalawantin Fort) एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे या ऐतिहासिक किल्ल्याच्या सुळक्याचा (Cone) काही भाग खचल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने पावले उचलत पुढील आदेशापर्यंत कलावंतीन दुर्गावर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या ट्रेकिंगला पूर्णपणे बंदी घातली आहे.

नेमकी घटना काय?
पनवेल तालुक्याच्या हद्दीत असलेला पर्यटकांचा आणि ट्रेकर्सचा आवडता ठिकाण असलेला कलावंतीन दुर्ग आपल्या बिकट सुळक्यासाठी आणि साहसी चढाईसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागाची माती सैल झाली आहे. यामुळे सोमवारी (दि. २०) मुसळधार पावसामुळे कलावंतीन दुर्गाच्या सुळक्याचा काही भाग अचानक खचला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु हा प्रकार अत्यंत धोकादायक मानला जात आहे.

प्रशासनाचे कडक निर्देश आणि ट्रेकिंगवर बंदी
कलावंतीन दुर्गाचा सुळका खचल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि वन विभागाने तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. पावसाळ्याच्या दिवसांत पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत, जोपर्यंत पूर्णपणे पाहणी करून सुरक्षिततेची खात्री होत नाही, तोपर्यंत कोणीही पर्यटकाने किंवा ट्रेकर्सने ट्रेकिंगसाठी जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाने पुढील आदेश येईपर्यंत कलावंतीन दुर्गावर जाण्यावर पूर्ण बंदी घातली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *