अमरावती: बसस्थानकातून एखादी दुचाकी किंवा वस्तू चोरीला जाणे ही बाब ऐकली असेल, पण चक्क मोठी इलेक्ट्रिक बसच चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या इमामवाडा बस स्थानकावरून थेट 'शिवाई' इलेक्ट्रिक बस चोरून पळवणाऱ्या एका अट्टल चोरट्याला अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ कोटी ५३ लाख रुपये किमतीची शिवाई बस जप्त केली असून, आरोपीच्या कबुलीनाम्याने पोलीसही हादरले आहेत.
नेमके काय घडले? विष्णू गणपती नीलावर (वय २३, रा. हाईत नगर, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २ जुलै रोजी राजापेठ पोलिसांनी राजापेठ परिसरात गस्त घालत असताना या संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने नागपूरच्या इमामवाडा बस स्थानकावरून १ जुलै रोजी रात्री चार्जिंगला लावलेली शिवाई इलेक्ट्रिक बस चोरल्याची कबुली दिली.
२० बसेस चोरल्याची कबुली: केवळ एक बस नाही, तर या आरोपीने तेलंगणा, हैदराबाद आणि आंध्रप्रदेशातून तब्बल २० बसेस चोरल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. आरोपीचा गुन्हेगारी पॅटर्न अत्यंत वेगळा होता; तो एकटाच बस चोरून पळून जायचा, त्यानंतर बसमधील महागडे पार्ट जसे की बॅटऱ्या, टायर आणि डिस्क काढून विकायचा आणि उर्वरित बस सोडून द्यायचा. त्याने नांदेड बस डेपोतूनही बस चोरल्याचे मान्य केले असून, त्याच्यावर यापूर्वीच वजिराबाद (नांदेड) आणि तिरुमला (आंध्रप्रदेश) पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
पोलीस पथकाची कारवाई: राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला. पुढील तपासासाठी आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या अट्टल चोरट्याच्या अटकेमुळे बस चोरीच्या अनेक प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहर
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
महाराष्ट्र
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
गुन्हा
- बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!
- पुणे: अटकेनंतरही मुजोरी संपेना; माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचे अश्लील हावभाव
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
- पुणे: जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह डिकीत कोंबून रस्त्यावर फेकला; 'अपघाताचा' बनाव उघड
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- शिक्षणासाठी अफाट जिद्द; टेबल-खुर्ची नाही, तरीही रस्त्याच्या कडेला अभ्यास करणाऱ्या चेन्नईच्या मुलीचे कौतुक!
- पोस्ट ऑफिसच्या 'या' सुरक्षित योजनेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात गुंतवणूक; केवळ व्याजातून होईल लाखोंची कमाई!
- वनडे क्रिकेट संपणार? आर. अश्विनच्या मोठ्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; ५० षटकांच्या फॉरमॅटवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!
- बलुचिस्तान हादरलं! प्रवास अर्ध्यावरच संपला... भीषण बस अपघातात ४० जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी.

























Subscribe to my channel



