धोरणांना अधिक चांगला आकार देण्यासाठीआपल्याला विश्वासार्ह लोकसंख्या अंदाजांची गरजअसते. मात्र भारताचे लोकसंख्याविषयक अंदाज - तेसंयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (यूएनडीपी) तयारकेले आहेत - एक चिंताजनक चित्र मांडतात. हे अंदाजकदाचित 10 कोटी लोकसंख्या व अनेक दशकांच्याकालावधीच्या संदर्भात चुकीचे ठरू शकतात. यासाठीसरकार जबाबदार आहे. कारण 2021 मध्ये जनगणनाझाली नाही.त्यानंतर ती वर्षानुवर्षे पुढे ढकलली गेली.मागील जनगणना 15 वर्षांपूर्वी झाली होती. त्यामुळे सर्व अंदाज जुन्या व कालबाह्य जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित राहिले आहेत. या प्रक्रियेत भारताने भविष्यातील संभाव्य 10 कोटीनागरिक जणू चित्रातूनच वगळले. यात ते तरुण ग्राहक व कामगारही आहेत. ते भारताच्या आर्थिक वाढीला गतीदेऊ शकले असते. देशाला विकसित राष्ट्र बनवण्यात योगदान देऊ शकले असते. आपण अनेक वर्षे वाटपाहत होतो तो लोकसंख्यात्मक लाभांश (डेमोग्राफिक डिव्हिडंड) अचानक नाहीसा होत असल्यासारखावाटत आहे. जुन्या व अप्रचलित आकडेवारीवरआधारित अंदाजांचे अनेक धोके व दुष्परिणामअसतात. 2011 च्या जनगणनेवर आधारितयूएनडीपीच्या 2024 च्या अंदाजानुसार भारताचीलोकसंख्या 2060 च्या दशकाच्या सुरुवातीला 1.7अब्जांच्या शिखरावर पोहोचणार होती. मात्र नुकत्याचजाहीर सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टिम (एसआरएस)2024 च्या प्रजनन दरासंबंधी आकडेवारीवर आधारितनवीन अंदाज सूचित करतात की भारताची लोकसंख्यात्यापेक्षा खूप आधी, सुमारे 1.6 अब्जांच्या पातळीवरसर्वोच्च बिंदू गाठेल. हे 2060 च्या दशकात नव्हे, तर2040 च्या दशकाच्या मध्याच्या आसपास घडेल.त्यानंतर लोकसंख्या घटण्यास सुरुवात होईल आणि हीघट लोकसंख्या वाढीच्या वेगापेक्षाही अधिक तीव्र असूशकते. 89 लाख लोकांच्या नमुन्यावर आधारितएसआरएस 2024 च्या अहवालानुसार भारताचा एकूणप्रजनन दर - म्हणजे एका महिलेने आयुष्यात जन्मदिलेल्या मुलांची सरासरी संख्या - 1.9 वर घसरली. हादर लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्यापातळीपेक्षा कमी आहे. भारताचे लोकसंख्यात्मकसंक्रमण इतक्या वेगाने पुढे गेले आहे की देशातील आठराज्यांमध्ये प्रजनन दर 1.5 किंवा त्याहूनही कमी झालाआहे, जो स्कॅन्डिनेव्हियन देशांच्या पातळीशी तुलनीयआहे. आता आपल्याकडे नवीन आकडेवारी उपलब्धअसल्याने अनेक गैरसमज दूर होत आहेत. एसआरएस2024 चा अहवाल त्या व्यापक समजुतीचे खंडन करतो.भारतातील प्रजनन प्रवृत्ती देशाला दोन वेगळ्या भागांतविभागते - कमी प्रजनन दर असलेली दक्षिणेकडीलराज्ये आणि उच्च प्रजनन दर असलेली उत्तरेकडीलराज्ये अशी धारणा होती. प्रत्यक्षात हिंदी पट्ट्यातील चारराज्ये वगळता देशात प्रजनन दर रिप्लेसमेंट रेटच्या खालीपोहोचला आहे. सर्वात कमी प्रजनन दर असलेली राज्येदेशाच्या विविध भागांत आहेत : उत्तर आणिउत्तर-पश्चिमेकडे दिल्ली (1.2), जम्मू-काश्मीर(1.5), पंजाब (1.5) आणि हिमाचल प्रदेश (1.5);पूर्व आणि ईशान्येकडे पश्चिम बंगाल (1.3), ओडिशा(1.7) आणि आसाम (2.0); पश्चिम महाराष्ट्र(1.5), गुजरात (1.8); तर दक्षिणेकडे केरळ (1.4),तामिळनाडू (1.3), आंध्र प्रदेश (1.5) आणि कर्नाटक(1.5). एसआरएसने सर्व राज्यांची आकडेवारी जाहीरकेली. त्या सर्व ठिकाणी प्रजनन दरात घट नोंदवली.त्यामुळे सरकारने मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रक्रियेत 2011च्या जनगणनेऐवजी एसआरएस 2024 वर आधारितलोकसंख्या अंदाजांचा वापर केला, तरी परिणामांमध्येमोठा बदल होण्याची शक्यता नाही. तरी उपलब्धअद्ययावत आकडेवारी वापरणे अधिक योग्य ठरेल. या शतकाखेरीस भारताची लोकसंख्या 1 अब्जांपेक्षाहीकमी असण्याची शक्यता आहे. वर्ष 2000 मध्येभारताची लोकसंख्या रचना आदर्श पिरॅमिडसारखीहोती. तिच्या पायथ्याशी मोठी तरुण लोकसंख्या आणिवर तुलनेने कमी वृद्ध लोकसंख्या होती. मात्र 2100 पर्यंतया पिरॅमिडचा पाया आकुंचन पावलेला असेल.
(हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) नवीन आकडेवारी अनेक गैरसमज दूरकरत आहे. एसआरएस 2024 चाअहवाल भारतातील प्रजनन प्रवृत्तीदेशाला दोन वेगळ्या भागांत विभागते,या समजुतीचे स्पष्टपणे खंडन करते. हागैरसमज म्हणजे- कमी प्रजनन दरअसलेली दक्षिणेकडील राज्ये व उच्चप्रजनन दर असलेली उत्तरेकडील राज्ये.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- चंद्रपूर: "पप्पा, मला का मारताय?" बापाच्या हल्ल्यातून १२ वर्षांच्या मुलाने स्वतःचा जीव वाचवला;
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
महाराष्ट्र
- पुणे: "ओव्हरटेकच्या नादात वेगाने आलेल्या टेम्पोने उडवले; शिक्रापूरमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या कामगाराचा जागीच मृत्यू."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- जालना: 'बस सुरू करा, नाहीतर आमचं शिक्षण थांबेल'; जालन्यातील विद्यार्थिनींचा शिक्षणासाठी रस्त्यावर संघर्ष.
- सांगली: "बनावट सह्या करून बहिणीला सव्वा कोटींचा चुना; सख्ख्या भावासह सोसायटी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल."
गुन्हा
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
- कोल्हापूर: सरनोबतवाडीत खळबळ अनैतिक संबंधांच्या वादातून दिरा कडून वहिनीची हत्या, आरोपी जेरबंद
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- उत्तर प्रदेश: रसमलाईचा वाद अंगलट! धाकट्या भावाकडून दादा-वहिनीवर कात्रीने जीवघेणा हल्ला
- गोवा: डेंग्यूचा हाहाकार अवघ्या १० दिवसांत ७१ रुग्ण, आरोग्य यंत्रणेत खळबळ
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
























Subscribe to my channel




