पिंपरखेड,(शिरूर) प्रफुल्ल बोंबे (दि. ०८) ; शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड येथील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी सौम्या सुनिल वरे व जांबुत केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फाकटे येथील इयत्ता आयुष नागेश केदारी यांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश संपादन करून ग्रामीण भागातील मराठी शाळांचा नावलौकिक वाढविला आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
जवाहर नवोदय विद्यालयातील अवघ्या ८० जागांसाठी तब्बल १,६०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या तीव्र स्पर्धेत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या सौम्या ने तब्बल ९७.५० % तर आयुष ने ९६ .२५ % एवढे गुण मिळवत यश प्राप्त करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. सौम्या आणि आयुष हे दोघेही हा अत्यंत हुशार, मेहनती, कष्टाळू आणि हजरजबाबी विद्यार्थी म्हणून ओळखला जातात.
आजच्या इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या आकर्षणाच्या काळात ग्रामीण भागातील मराठी शाळांमधूनही गुणवंत विद्यार्थी घडत असल्याचे आयुषच्या यशाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मराठी शाळांमध्ये उपलब्ध असलेले दर्जेदार शिक्षण, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची जिद्द यामुळे अशा यशकथा घडत असल्याचे शिक्षण क्षेत्रातून सांगितले जात आहे.
सौम्या हिचे वडील सुनिल वरे हे पिंपरखेड येथे नागरी सुविधा केंद्र चालवत आहेत तर आई सारिका वरे या ग्राममहसूल मध्ये कोतवाल म्हणून कार्यरत आहेत. तर आयुषची आई सीमा केदारी या फाकटे गावच्या ग्रामपंचायत सदस्या असून वडील नागेश केदारी हे गुरुनाथ विद्यालय, वडनेर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या संस्कारांसह शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन आयुषच्या यशामागे महत्त्वाचे ठरले.
त्याला मार्गदर्शन करणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी. सी. बारहाते, लहू गाजरे, पोपट भालेराव तर शिष्यवृत्ती तज्ज्ञ व आदर्श शिक्षक बाबाजी पोपट हिलाळ यांनी गुणवंतांचे विशेष कौतुक केले. तसेच शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे, पंचायत समिती सदस्या सुनिता कड, गटशिक्षणाधिकारी प्रितम कोकणे, विस्ताराधिकारी बाळकृष्ण कळमकर, केंद्रप्रमुख गणेश काळे, मुख्याध्यापिका प्रिया काळे तसेच ग्रामस्थांनी सौम्या व आयुषचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.ग्रामीण भागातील मराठी शाळांमधून घडणाऱ्या अशा यशस्वी विद्यार्थ्यांमुळे शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळत असून मराठी शाळांबद्दलचा विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



