लग्नाचा मांडव उखडलाही नव्हता तोच घात! लग्नानंतर अवघ्या १२ व्या दिवशी २६ वर्षीय तरुण तलाठ्याची आत्महत्या; पत्नीविरोधात गुन्हा दाखल

Tragic End: 26-Year-Old Newlywed Talathi Commits Suicide Just 12 Days After Marriage in Ambajogai; Case Filed Against Wifeबीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मोरेवाडी (ता. अंबाजोगाई) येथील एका २६ वर्षीय तरुण तलाठ्याने लग्नानंतर अवघ्या १२ व्या दिवशीच गळफास लावून आत्महत्या केली. या खळबळजनक घटनेमागील मूळ कारण आता समोर आले असून, कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

लग्नानंतर अवघ्या १२ व्या दिवशीच टोकाचे पाऊल मृत तरुण हा महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत होता. त्याचे अवघ्या १२ दिवसांपूर्वीच मोठ्या उत्साहात लग्न झाले होते. घरात नवीन लग्नाचा आनंद आणि वातावरण असतानाच, या तरुणाने अचानक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

पत्नीविरोधात गुन्हा दाखल या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत तलाठ्याच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, लग्नानंतर काही दिवसांतच पत्नीने पतीसोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला होता. याच मानसिक तणावातून आणि कौटुंबिक वादाला कंटाळून त्यांच्या मुलाने आपले जीवन संपवले.

मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आणि फिर्यादीच्या आधारवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात मृत तलाठ्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *