भक्ती आणि श्रद्धेचे माहेरघर असलेल्या तीर्थक्षेत्र आळंदीतून वारकरी संप्रदायाला धक्का देणारी आणि अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या संजीवन समाधी मंदिरात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माऊलींच्या चरणी अर्पण होणाऱ्या पैशांवर चक्क एका सेवेकऱ्यानेच डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंदिरातील दानपेटी सुरक्षित ठेवण्याची आणि त्यातील रक्कम कॅशियरकडे जमा करण्याची जबाबदारी असलेल्या सेवकानेच संस्थानच्या विश्वासाला तडा दिला आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल बाळू वारुळे (वय ३३ वर्षे, रा. चोविसावाडी, ता. हवेली, जि. पुणे; मूळ गाव- वारूळवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी सेवकाचे नाव आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर महादेव वीर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. आरोपी विशाल हा माऊली मंदिरात गेल्या काही काळापासून सेवक म्हणून कार्यरत होता आणि त्याच्यावर मंदिरात जमा होणाऱ्या दानपेटीतील पैसे काढून ते सुरक्षितपणे कॅशियर रूममध्ये पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम सोपवण्यात आले होते.
अशी केली १५ हजारांची चोरी:
१२ मे, १३ मे आणि १६ मे रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजेच्या सुमारास जेव्हा नेहमीप्रमाणे दानपेटीतील पैसे मोजणी आणि ते गोळा करण्याचे काम सुरू होते, तेव्हा आरोपीने एक वेगळीच शक्कल लढवली. दानपेटीतून पैसे काढून बकेटात भरत असताना, त्याने आजूबाजूच्या लोकांची नजर चुकवून काही रक्कम एका गोणीत भरली. त्यानंतर पैशांच्या ऐवजी रिकामे ट्रे त्यावर ठेवावेत आणि ती गोणी कॅशियर रूममध्ये नेली. तिथेही कोणाचे लक्ष नसताना त्याने ते पैसे कपाटाच्या मागे लपवून ठेवले. त्यानंतर कपाटावर मंदिरातील फुलांचे हार ठेवून, आपण फक्त हार घेऊन बाहेर जात असल्याचा बनाव कॅशियर समोर केला. अशा प्रकारे त्याने तीन दिवसांत प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे एकूण १५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
CCTV फुटेज आणि व्यवस्थापनाच्या सतर्कतेमुळे बिंग फुटले:
दानपेटीतील रक्कमेमध्ये तफावत जाणवू लागल्याने मंदिर प्रशासनाचा संशय बळावला. यानंतर मंदिर प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली असता, आरोपी विशाल वारुळे याच्या संशयास्पद हालचाली कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले. त्याने अत्यंत चलाखीने डोळे चुकवून रोकड लंपास केल्याचे उघड झाले. यानंतर तातडीने आळंदी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये विश्वासाचा गुन्हा दाखल करून आरोपी विशाल वारुळे याला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




