नवी मुंबई: नवी मुंबईतील अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पामबीच मार्गावरील एका भरधाव कारच्या अपघातामुळे पोलिसांच्या हाती तब्बल ७० लाख रुपयांच्या अफूचे (Opium) मोठे घबाड लागले आहे. या अपघाताने ड्रग्ज तस्करांचा एक मोठा काळाबाजार उघड केला आहे. विशेष म्हणजे केवळ अमली पदार्थच नव्हे,
तर या कारमधून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे आणि संशयास्पद केमिकलही जप्त केले आहे. टायर फुटल्याने अपघात, चालक फरार:ही घटना शुक्रवारी (२२ मे) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. पामबीच मार्गावरून सीबीडी-बेलापूरच्या दिशेने जाणारी एक भरधाव एमजी हेक्टर कार (क्रमांक RJ 19 CK 4207) नेरूळ ट्रॅफिक सिग्नलजवळ आली असता, तिचा टायर फुटला. यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्यावरील रेलिंग व ट्रॅफिक आयलंडला जाऊन धडकली. या भीषण अपघातात कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा खांबही तुटला. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच कारचालक गाडी सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला.
कारमधून उग्र वास आल्याने संशय बलवला:अपघाताची माहिती मिळताच सीवूड वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कारची पाहणी करताना त्यांना आतून एक तीव्र आणि उग्र वास येत असल्याचे जाणवले. संशय आल्याने पोलिसांनी कारच्या मागील डिग्गीची (Boot) झडती घेतली. तेव्हा त्यांना प्लास्टिकच्या ३ गोण्या आढळल्या, ज्यामध्ये सुमारे ६९ ते ७० किलो अफू भरलेला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात या अफूची किंमत ७० लाख रुपये इतकी आहे. कारमध्ये सापडले पिस्तूल आणि केमिकल:पोलिसांनी कारच्या डॅशबोर्डची तपासणी केली असता, त्यामध्ये एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसे सापडली.
याशिवाय कारमध्ये १५ ते २० लिटर संशयास्पद केमिकलचे डबेही आढळले असून ते प्रयोगशाळेत (Lab) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. राजस्थान कनेक्शन आणि पोलिसांचा तपास:सहायक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार राजस्थानमधील गणपत बीरबल राम यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. पामबीच मार्गावर अपघातांच्या घटना नेहमीच घडतात, मात्र अपघातातून इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि ड्रग्जचा साठा उघडकीस येण्याची ही पहिलीच घटना आहे. याप्रकरणी एनआरआय तटीय पोलिसांनी (NRI Coastal Police) अज्ञात आरोपींविरुद्ध एनडीपीएस (NDPS
Act) आणि बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.
शहर
- गोरेगावात बांधकाम साईटवर थरार! कोअर कटिंग मशिनचा शॉक लागून ३४ वर्षीय कामगाराचा मृत्यू; कंत्राटदारावर गुन्हा दाखल!
- मुंबई पालिकेत सल्लागारांवरून मोठा संताप! स्थायी समितीने रोखले प्रस्ताव; 'उद्या अर्थसंकल्प तयार करायलाही सल्लागार नेमाल का?'
- कल्याण पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी! तब्बल ३४ कोटी १८ लाखांचे हेरॉईन जप्त; कुख्यात 'पठाण गँग'चा म्होरक्या ५ साथीदारांसह गजाआड!
- ढग आले दाटून, पाऊस आला धावून! मुंबई, पुणे, रायगड अन् रत्नागिरीत मान्सूनपूर्व सरी; उकाड्यापासून मोठा दिलासा!
महाराष्ट्र
- गोरेगावात बांधकाम साईटवर थरार! कोअर कटिंग मशिनचा शॉक लागून ३४ वर्षीय कामगाराचा मृत्यू; कंत्राटदारावर गुन्हा दाखल!
- मुंबई पालिकेत सल्लागारांवरून मोठा संताप! स्थायी समितीने रोखले प्रस्ताव; 'उद्या अर्थसंकल्प तयार करायलाही सल्लागार नेमाल का?'
- चंद्रपूरच्या जंगलात भीषण थरार! तेंदूपाने गोळा करणाऱ्या महिलांवर वाघिणीचा प्राणघातक हल्ला, ४ महिलांचा जागीच मृत्यू!
- कल्याण पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी! तब्बल ३४ कोटी १८ लाखांचे हेरॉईन जप्त; कुख्यात 'पठाण गँग'चा म्होरक्या ५ साथीदारांसह गजाआड!
गुन्हा
- पुणे पोलिसांचा मोठा दणका! बारामतीत आंतरराज्यीय गांजा तस्करीचा पर्दाफाश; ३ कोटी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ७ तस्करांना बेड्या!
- लातूरमध्ये शेतीच्या वादातून थरार! लाठ्या-काठ्यांच्या बेदम मारहाणीत शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, भाऊ गंभीर; ८ जण ताब्यात!
- सोशल मीडियावरील वादळानंतर खळबळ! 'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपकेंना जीवे मारण्याची धमकी!
- अमरावतीत लग्नमंडपात थरार! डीजेवर नाचण्याच्या वादातून स्टेजवरच नवरदेवावर सपासप वार; ड्रोन कॅमेऱ्याने २ किमी केला हल्लेखोराचा पाठलाग!
राजकीय
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
इतर
- राज्य सरकारचा ३ महिन्यांपूर्वीचा गाजावाजा ठरला फुसका! रॉकेल पुरवठा अद्याप कागदावरच; केवळ १ रुपया कमिशनमुळे रेशन दुकानदारांची पाठ!
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- फॅटी लिव्हरचा धोका! शरीरात दिसणारे 'हे' सुरुवातीचे संकेत ओळखा; लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी खा हे अन्न!
- बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात! २० गावांमध्ये १२७ 'रिचार्ज शाफ्ट' कामांना मंजुरी; भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय!
मनोरंजन
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- क्रिप्टो युजर्सना मोठा दिलासा! डीपफेक फ्रॉड रोखण्यासाठी 'बायनान्स' वापरणार प्रगत AI तंत्रज्ञान!
- ३०० किमी अंतरावर अचूक वेध! पुण्याच्या कंपनीने बनवलेल्या 'सूर्यास्त्र' रॉकेटची यशस्वी चाचणी!
- व्यापार तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन! अनावश्यक विदेशी वस्तूंच्या आयातीवर बंदी किंवा मोठा कर लावण्याची तयारी!
- परराष्ट्र वर्तुळातून अत्यंत दुर्दैवी बातमी! बांगलादेशमधील भारतीय दूतावासात असिस्टंट प्रोटोकॉल ऑफिसर नरेन धर यांचं निधन.

























Subscribe to my channel



