जगभरात सहा दशकांपासून सीईओ आणि संचालक मंडळांना सल्ला देताना मी एक गोष्ट सातत्याने पाहिलीआहे. ही बाब ग्रेट लीडर्सना गुड लीडर्सपासून वेगळेकरते. ती बुद्धिमत्ता नाही. रणनीती नाही. केवळअनुभवही नाही. ती म्हणजे- आत्मविश्वास. अहंकारनाही. ते दिखाऊ धाडसही नसते. तो असतो आत्मविश्वास. आत्मविश्वास ही आपल्या ‘बीइंग’ची एक अवस्थाआहे. तो आपल्या क्षमतांची सखोल जाणीव व आपणकाम करत असलेल्या वातावरणाबद्दलची स्पष्ट ओळखयांतून निर्माण करून देणारा असतो. स्वतःच्या शक्तीचीस्पष्ट जाणीव आणि मर्यादा प्रामाणिकपणे स्वीकारल्यानेविश्वास निर्माण होतो, तोच आत्मविश्वास असतो.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या मर्यादा तुमच्यावाटेतील अडथळा बनू नयेत. त्यांनी तुम्हाला पुढेजाण्यास प्रेरित केले पाहिजे. अनेक लीडर्सआत्मविश्वास म्हणजे निश्चितता असे मानण्याची चूक करतात. पण या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. निश्चितता म्हणते : मला नेमके काय होणार आहे हे माहिती आहे. आत्मविश्वास म्हणतो : नेमके काय होणार आहे हेमाहिती नाही, पण त्याचा सामना करण्याची आणिपरिस्थिती हाताळण्याची क्षमता माझ्यात आहे, यावरमाझा विश्वास आहे. आजच्या जगात हा फरक अत्यंतमहत्त्वाचा आहे. खरा आत्मविश्वास घडवणाऱ्या तीन गोष्टी आहेत.पहिली म्हणजे ज्ञान आणि कौशल्य. तुम्हाला तुमच्याक्षेत्राची सखोल आणि स्पष्ट समज असते, तेव्हाआत्मविश्वास दाखवण्याची गरज राहत नाही. तोआपोआप दिसून येतो. तयारी ही आत्मविश्वासाचीपायाभरणी असते. मनापासून मेहनत घेतली आहे, त्यालादिखावा करण्याची गरज भासत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अनुभव आणि त्यातून मिळालेलीशिकवण. प्रत्येक आव्हान, प्रत्येक धक्का आणितणावात घेतलेला प्रत्येक निर्णय तुमची पायाभरणीअधिक मजबूत करतो. ज्याने संकटांचा सामना करूनत्यातून मार्ग काढला आहे, त्याचा आत्मविश्वास हाफक्त सोप्या परिस्थिती पाहिलेल्या व्यक्तीपेक्षा पूर्णपणेवेगळा असतो. तुमचे कठीण क्षण वाया जाऊ देऊ नका.त्यातून शिकण्यासारखे काहीतरी जरूर घ्या. तिसरी गोष्टम्हणजे आत्मजाणीव. तुम्ही कोणत्या गोष्टीत चांगलेआहात, हे जाणून घ्या. तसेच कोणत्या क्षेत्रांत तुम्हालाइतरांची गरज आहे, हेही समजून घ्या. स्वतःमध्येकोणतीही कमजोरी नाही, असा दिखावा करणारा लीडरइतरांना फसवू शकत नाही आणि स्वतःही काही शिकूशकत नाही. स्वतःच्या ताकदी आणि मर्यादा स्पष्टपणेओळखणाऱ्या लीडरचाच आत्मविश्वास सर्वाधिकटिकाऊ असतो. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा :आत्मविश्वास स्थिर नसून गतिशील असतो. हीच गोष्टआहे. अनेकांना समजत नाही. आत्मविश्वास ही अशीगोष्ट नाही की एकदा मिळवली आणि कायम स्वतःकडेठेवली. तो सतत बदलत राहतो. तो तुमच्यासोबतविकसित होत राहायला हवा. जग वेगाने बदलत आहे.त्याचे उदाहरण इतिहासात मिळत नाही. नवीन तंत्रज्ञान,नवीन भू-राजकीय वास्तव आणि नवीन व्यावसायिकमॉडेल्स सतत समोर येत आहेत. आजच्याआत्मविश्वासी लीडरने कालचे काम विसरण्यास,आजचे सत्य स्वीकारण्यास आणि उद्याच्या गरजांसाठीस्वतःला तयार ठेवण्यास सक्षम असले पाहिजे. याचा अर्थ असा की आत्मविश्वास सतत ‘रिन्यू’ करावालागतो- सातत्याने शिकत राहून, प्रामाणिकआत्मपरीक्षण करून आणि ‘मी चुकीचा होतो, आतामला ते समजले आहे’ असे सांगण्याचे धैर्य ठेवून.एखादा लीडर खऱ्या आत्मविश्वासाने एखाद्या खोलीतप्रवेश करतो. तेव्हा काहीतरी बदलते. टीमलाही तेजाणवते. निर्णय अधिक स्पष्ट होतात. जोखीमहाताळण्याजोगी वाटू लागते. इनोव्हेशन शक्य होते.आत्मविश्वासी लीडर इतरांचा आत्मविश्वास कमीकरत नाही; तो वाढवतो. दररोज संध्याकाळी स्वतःला तीन प्रश्न विचारा. आज मीकाय चांगले केले? आज मी काय शिकलो? आणि मीकोणती गोष्ट वेगळ्या पद्धतीने करू शकलो असतो? हीसाधी सवय सातत्याने अंगीकारली, तर ती खरीआत्मजाणीव निर्माण करते, जी खऱ्या आत्मविश्वासाचापाया असते. यात काही नाट्यमय किंवा गुंतागुंतीचे नाही.पण प्रामाणिकपणे आणि सातत्याने हे केल्यास, तुम्हीस्वतःकडे पाहण्याची आणि इतरांनी तुमच्याकडेपाहण्याची दृष्टी बदलू शकते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) आत्मविश्वास स्थिर नसतो, तर तोगतिशील असतो. ही गोष्ट अनेकांनासमजत नाही. एकदा मिळवला कीकायम टिकणारी गोष्ट आत्मविश्वासनाही. तो तुमच्यासोबत सतत विकसितहोत राहिला पाहिजे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




