कल्याण: कल्याण-डोंबिवली परिसरात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कल्याण शहरातील जोशीबाग परिसरात एका तरुणीसोबत भररस्त्यात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडल्याची घटना उघडकीस आली आहे. भरचौकात दिवसाढवळ्या एका २२ वर्षीय तरुणीसोबत एका विकृत युवकाने अश्लील आणि गैरवर्तन केले. मात्र, या प्रकरणाची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्रे फिरवून अवघ्या एका तासाच्या आत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
एकटी असल्याचा फायदा घेऊन कृत्यमिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कामावरून जात असताना जोशीबाग परिसरातील एका चौकात आरोपीने तिला गाठले. ती एकटी असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यासोबत हुज्जत घालत अश्लील वर्तन आणि विनयभंग केला.
भररस्त्यात अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी प्रचंड घाबरली, मात्र तिने धीर न सोडता तातडीने महात्मा फुले पोलीस ठाणे गाठले आणि घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. भरचौकात तरुणीसोबत असा प्रकार घडल्याचे समजताच स्थानिक नागरिकांमध्ये आणि विशेषतः महिलांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली.
सार्वजनिक ठिकाणीही महिला सुरक्षित आहेत का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला.पोलिसांची तत्परता, तासाभरात मुसक्या आवळल्याघटनेचे गांभीर्य ओळखून महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तपासाची पथके रवाना केली. परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि तरुणीने दिलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या एका तासाच्या आत आरोपी प्रथमेश जाधव याला ताब्यात घेऊन अटक केली.
पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंग आणि अश्लील वर्तनाचा रीतसर गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी दाखवलेल्या या जलद तत्परतेमुळे आरोपी तात्काळ गजाआड झाला असला, तरी परिसरातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमधून विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर कठोर जरब बसवण्याची मागणी केली जात आहे.
शहर
- पुणे: बोर्ड तोडूनच दाखवा! लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून फत्तेचंद रांका आक्रमक; महापालिका अधिकाऱ्यांशी जोरदार बाचाबाची
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
- नाशिक: लुटणाऱ्यांनाच तुम्ही निवडून देता, तुमचे रक्त का खवळत नाही; खड्डे, दूषित पाणी आणि वृक्षतोडीवरून सुजात आंबेडकरांचा संताप
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
महाराष्ट्र
- कोल्हापूर: महिन्याला २६ कोटींहून अधिक उलाढालीची झेप! गोकुळच्या दूध दरवाढीच्या निर्णयावेळी चार अशासकीय सदस्य अनुपस्थित
- पुणे: बोर्ड तोडूनच दाखवा! लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून फत्तेचंद रांका आक्रमक; महापालिका अधिकाऱ्यांशी जोरदार बाचाबाची
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
- महाराष्ट्र: लोकसहभागातून जलसंधारणाला वेग; चार गावांत वनराई बंधाऱ्यांची उभारणी
गुन्हा
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा


























Subscribe to my channel




