वसई-विरार मेट्रो मार्गिकेतून पश्चिम पट्टा गायब? नव्या आराखड्यावर सामाजिक कार्यकर्त्यांचा तीव्र आक्षेप; मुख्यमंत्र्यांकडे धाव मुंबई/वसई:वसई-विरार आणि मिरा-भाईंदर या उपनगरांना जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो मार्गिका १३ (Bhayandar-Virar Metro Corridor) च्या नवीन विस्तृत प्रकल्प अहवालाला (DPR) मंजुरी मिळत असतानाच, या प्रकल्पाभोवती आता वादाचे ढग जमा झाले आहेत. या मेट्रोचा मार्ग पूर्वेकडील भागातून नेण्यात आल्यामुळे, पश्चिमेकडील अत्यंत दाट लोकवस्ती असलेल्या भागांवर मोठा अन्याय झाला असल्याचा आरोप होत आहे. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रवीण पाटील यांनी थेट मुख्यमंत्री आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (MMRDA) लेखी तक्रार नोंदवून मार्ग बदलण्याची मागणी केली आहे.
पश्चिम पट्ट्यातील लाखो प्रवाशांकडे दुर्लक्षतक्रारीनुसार, नवीन मेट्रो मार्गिकेचे नियोजन करताना वसई-विरारच्या पश्चिम बाजूकडील स्टेला, माणिकपूर, सनसिटी, अंबाडी रोड आणि नवघर यांसारख्या अत्यंत दाट लोकवस्ती असलेल्या भागांना पूर्णपणे डावलण्यात आले आहे. या भागात राहणारे लाखो नोकरदार दररोज मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने प्रवास करतात.
त्यांना खरी वाहतूक कोंडी आणि गर्दीचा सामना करावा लागतो. मात्र, मेट्रो मार्गिकेचे नियोजन पश्चिमेऐवजी पूर्वेकडील भागातून फिरवण्यात आल्याने या सामान्य प्रवाशांना कोणताही थेट फायदा मिळणार नाही. बिल्डर धार्जिणे नियोजन असल्याचा संशयप्रशासनाने केलेल्या या एकतर्फी नियोजनावर नागरिकांमधून संशय व्यक्त केला जात आहे. पूर्वेकडील ज्या भागातून सध्या मेट्रो नेण्याचे प्रस्तावित आहे, तिथे सध्या लोकवस्ती अतिशय विरळ आहे, परंतु मोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे केवळ विकासक आणि मोठ्या बिल्डरांच्या व्यावसायिक फायद्यासाठीच मेट्रोचा मूळ मार्ग बदलण्यात आला आहे का, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
सुधारित आणि संतुलित मार्गाची मागणीमिरा-भाईंदर ते विरार दरम्यानचा प्रवास सुकर करण्यासाठी एमएमआरडीएने १७ हजार ७२४ कोटी रुपयांचा नवीन आराखडा तयार केला आहे, ज्यामध्ये भाईंदर खाडीवर दुमजली पूल आणि वसई-नालासोपाऱ्यादरम्यान भूमिगत मार्ग प्रस्तावित आहे. परंतु, जर हा मार्ग पश्चिमेकडील प्रवाशांना जोडणार नसेल, तर या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा काय फायदा, असा आक्षेप घेतला जात आहे. त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी भाईंदरवरून थेट वसई-विरारच्या पश्चिम पट्ट्याला जोडणारी सुधारित मेट्रो मार्गिका आखण्यात यावी, जेणेकरून खऱ्या गरजूंना या आधुनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेता येईल, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- पुणे: कात्रजमध्ये थरारक खून! डोके, चेहरा आणि हातावर कोयत्याने अनेक वार करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
महाराष्ट्र
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
गुन्हा
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
























Subscribe to my channel




