Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने; मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री सह्याद्री अतिथीगृहात दाखल

Manoj Jarange Patil :  मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय सागर बंगल्यावर येण्याची घोषणा केली आहे. ते गेल्या 16 दिवसांपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषणास होते. तेथूनच त्यांनी आज भर पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक पवित्रा घेत सागर बंगल्याच्या दिशेने येण्याची घोषणा केली. यानंतर त्यांना ग्रामस्थांकडून कडाडून विरोध झाला. मात्र, ते सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. 

Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील सागर बंगल्याच्या दिशेने रवाना होताच फडणवीस साताऱ्यातून तातडीने मुंबईकडे

दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नियोजित दौऱ्यासाठी साताऱ्यात होते. त्यांनी सातारा दौरा आटपून तातडीने मुंबई गाठली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. याठिकाणी चहापान कार्यक्रम होणार असून विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेरल्या भूमिकेवर उभय नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *