लातूर: लातूर शहरातील बोधे नगर परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. घराबाहेर खेळत असताना अचानक तोल गेल्यानं पाणी साठवण्याच्या एका मोठ्या खड्ड्यात (हौदात) पडून दोन चिमुकल्या निष्पापांचा बुडून मृत्यू झाला आहे. दिव्या नवनाथ उबाळे (वय ६ वर्ष) आणि कार्तिक भरत कांबळे (वय ७ वर्ष) अशी मृत पावलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण बोधे नगर परिसरात शोककळा पसरली असून, चिमुकल्यांच्या आई-वडिलांनी केलेला आक्रोश उपस्थितांची मने हेलावून टाकणारा होता.
खेळता खेळता गेला जीव:
मिळालेल्या माहितीनुसार, बोधे नगर येथील रामला इंडस्ट्रीजच्या पाठीमागील मोकळ्या जागेत एका खाजगी पाणी पुरवठा व्यवसायिकाने पाण्याचा मोठा खड्डा (हौद) तयार केला होता. या ठिकाणी बोरवेलचे पाणी साठवून ते टँकरच्या माध्यमातून शहरातील विविध हॉस्टेल व इतर भागात पुरवले जात असे. रविवारी दुपारी दिव्या आणि कार्तिक हे दोघे घराशेजारी खेळत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते या पाण्याच्या साठवण खड्ड्यात पडले.
नागरिकांची धाव, डॉक्टरांनी घोषित केले मृत:
मुलं पाण्यात पडल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही तातडीने पाण्याच्या खड्ड्यातून बाहेर काढून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती या दोन्ही चिमुकल्यांना मृत घोषित केले. काळाने खेळता खेळता या दोन निष्पाप जीवांवर घाला घातल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा तीव्र संताप:
या अत्यंत वेदनादायी घटनेनंतर बोधे नगर भागातील स्थानिक नागरिकांनी लातूर शहर महानगरपालिकेच्या कारभारावर आणि निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. रहिवासी भागात अशा प्रकारे खुले आणि धोकादायक पाण्याचे खड्डे असताना प्रशासनाने वेळीच योग्य पावले का उचलली नाहीत, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. जर तक्रारींची वेळीच दखल घेऊन अशा धोकादायक ठिकाणांना बंदिस्त केले असते, तर आज दोन निष्पाप बालकांचे प्राण वाचले असते, अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- पुणे: कात्रजमध्ये थरारक खून! डोके, चेहरा आणि हातावर कोयत्याने अनेक वार करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
महाराष्ट्र
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
गुन्हा
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
























Subscribe to my channel




