Betrayal in the Family: Cousin loots gold and cash from brother's locked house in Pune!

रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास

Betrayal in the Family: Cousin loots gold and cash from brother's locked house in Pune!
पुणे (तळेगाव दाभाडे): पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे परिसरात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. मनोहरनगर परिसरात राहणाऱ्या सूरज विजयकुमार गायकवाड यांच्या घरात त्यांच्याच चुलत भावाने भरदिवसा चोरी केली आहे. आरोपीचे नाव उत्तम गायकवाड (वय ४०, रा. मोरखंडी, जि. बिदर, कर्नाटक) असे आहे.

ही घटना सोमवारी (दि. ११ मे) सकाळी ६ ते दुपारी २ या वेळेत घडली. सूरज आणि त्यांची पत्नी कामावर गेले असताना घर बंद असल्याची संधी साधून उत्तमने घरात प्रवेश केला. त्याने घरातील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. सूरज जेव्हा कामावरून परतले, तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.

याप्रकारानंतर सूरज गायकवाड यांनी तातडीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी चुलत भावाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ओळखीच्या व्यक्तींकडूनच अशा घटना घडत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *