मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सप्टेंबर हप्ता अपडेट: महिलांना १,५०० रुपये की थेट ३,००० रुपये मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती!

मुंबई : महाराष्ट्र शासनच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय अशा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत एक महत्त्वाची व मोठी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आता चांगलीच वाढली आहे. सध्या ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेला असूनही, सरकारकडून सप्टेंबर महिन्यातील १,५०० रुपयांच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा किंवा स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे राज्यातील कोट्यवधी पात्र महिलांच्या बँक खात्यात हा हप्ता नेमका कधी जमा होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने राज्यातील पात्र महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी दरमहा आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीच्या हप्त्यांच्या वितरणात काही तांत्रिक अडचणी किंवा प्रशासकीय कारणांमुळे उशीर झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता रखडल्यामुळे महिला वर्गामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये अशी चर्चा रंगली आहे की, सप्टेंबर आणि ऑक्टोबर असा दोन महिन्यांचा मिळून एकूण ३,००० रुपयांचा हप्ता एकत्रित जमा केला जाऊ शकतो का? मात्र, याबाबत शासन किंवा महिला व बालविकास विभागाकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

शासकीय यंत्रणेकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अर्जांची छाननी प्रक्रिया, आधार सीडिंग, बँक खात्यांची डीबीटी (DBT) लिंक तपासणी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम वेगाने सुरू आहे. ज्या महिलांचे अर्ज पूर्णपणे वैध ठरले आहेत आणि ज्यांच्या कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी नाही, अशा सर्व पात्र महिलांच्या खात्यात लवकच हप्त्याची रक्कम जमा केली जाईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने यापूर्वीही सण-उत्सवाच्या काळात किंवा काही प्रशासनिक बदलांमुळे हप्ते एकत्रित किंवा थोडे उशिराने जमा केले होते, त्यामुळे यंदाही सप्टेंबरचा हप्ता लवकरच खात्यात येईल अशी आशा महिलांना आहे.

तसेच, ज्या महिलांच्या अर्जांमध्ये काही तांत्रिक अडचणी किंवा नावात-बँक तपशिलात तफावत आढळली आहे, त्यांचे अर्ज पडताळणीच्या फेऱ्यात अडकल्याने त्यांना थोडा अधिक विलंब होऊ शकतो. प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे की, पात्र महिलांनी आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करून ठेवावे आणि मोबाईल नंबर चालू ठेवावा, जेणेकरून पैसे जमा झाल्यावर त्वरित मेसेज प्राप्त होईल. लवकरच शासनाकडून यासंदर्भात अधिकृत तारीख जाहीर होण्याची शक्यता असून, लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून लवकरच दिलासादायक बातमी मिलने अपेक्षित आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *