पुणे | पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून, जुन्या वादातून तरुणांवर जीवघेणे हल्ले होण्याचे दोन स्वतंत्र प्रकार उघडकीस आले आहेत. कोथरुडमध्ये एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले, तर हडपसरमध्ये एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.
प्रकरण १: कोथरुडमध्ये कोयता गँगची दहशत
कोथरुडमधील केळेवाडी परिसरात ३ मे रोजी रात्री ही घटना घडली. आदित्य ऊर्फ सनी राजू गाडे (वय २१) असे जखमी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलसिंग टाक याने गाडे यांच्या नात्यातील एका मुलीला पळवून नेले होते, त्यावरून त्यांच्यात पूर्ववैमनस्य होते. याच वादातून राहुलसिंग टाक, अनिलसिंग टाक, पिंटूसिंग दुधाणी आणि सुखासिंग दुधाणी यांनी आदित्यला रस्त्यात अडवून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात आदित्य गंभीर जखमी झाला असून, त्याच्या पत्नीने गायत्री गाडे (वय १९) हिने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
प्रकरण २: हडपसरमध्ये सिमेंटच्या गट्टूने हल्ला दुसरी घटना हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली. येथे गणेश संजू बिरादार (वय २५, रा. सासाणेनगर) या तरुणावर जुन्या भांडणाचे निमित्त काढून हल्ला करण्यात आला. आरोपी दुर्वांग मानकर आणि साहिल शेलार यांनी गणेशला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात सिमेंटचा मोठा गट्टू घातला.
या हल्ल्यात गणेश गंभीर जखमी झाला असून त्याच्या पत्नीने अपेक्षा बिरादार हिने काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
शहर
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
- मुंबई: तुरुंगात माझ्यावर विषप्रयोग झाला असावा का? खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा, राहुल गांधींच्या सल्ल्यानंतर करणार 'टॉक्सिक टेस्ट'!
- मुंबई: जोगेश्वरी-गोरेगाव SRA घरकुल घोटाळा: पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्रांना घरे वाटप केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे दोन अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे निर्देश!
महाराष्ट्र
- अमरावती: पेपरफुटीने संतापला युवा वर्ग! अमरावतीत MPSC विरोधात शेकडोंचा 'आक्रोश मोर्चा'; अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी
- पुणे: भीमाशंकरवाडीतील ९६ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा; राज्य सरकारकडून हिरवा कंदील, प्रत्येकाला मिळणार ५०० चौरस फुटाचा भूखंड
- यवतमाळ: शेवटचा प्रवासही धोकादायक! अंत्यसंस्कारासाठी नाल्याच्या पुलावरून मृतदेह नेण्याची वेळ; प्रशासनाचा अनास्था कारभार चव्हाट्यावर
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!
- चंदीगढ: संगीत जगतातून अत्यंत धक्कादायक बातमी; ३५ वर्षीय प्रसिद्ध पंजाबी गायक बलजीत सिंग याचा राहत्या घरी मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ!
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!




























Subscribe to my channel




