छत्रपती संभाजीनगर |शहरात सध्या उन्हाचा तडाखा वाढत असतानाच, सर्वसामान्य नागरिकांना आता गॅस सिलिंडरसाठीही प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने
नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. रणरणत्या उन्हात तासनतास रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने घरी परतण्याची वेळ अनेक ग्राहकांवर आली आहे.
३५ किलोमीटरचा प्रवास, तरीही प्रतीक्षाच
गॅस टंचाईची तीव्रता इतकी भीषण आहे की, पैठण तालुक्यातील बिडकीन डी एमआयसी सारख्या दूरच्या भागातून नागरिक तब्बल ३५ किलोमीटरचा प्रवास करून हायकोर्ट कॉलनीतील वितरण केंद्रावर येत आहेत. "दोन महिन्यांपासून चकरा मारून हैराण झालो आहोत, ही माझी चौथी फेरी आहे," अशी हतबलता एका ग्राहकाने व्यक्त केली. ग्रामीण भागात तर ४५ दिवसांनंतर बुकींग होते आणि त्यानंतरही १५ दिवस वाट पाहावी लागते, असे चित्र आहे.
प्रशासनाचे दावे फोल?
अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम पुरवठ्यावर झाल्याचे सांगितले जात असले तरी, केंद्र आणि राज्य प्रशासनाने सर्व काही सुरळीत असल्याचे दावे केले आहेत. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे. साताऱ्यातील अहिल्या एचपी गॅस वितरण केंद्रावर दररोज सकाळी ९ वाजेपासून दीड ते दोनशे नागरिक रांगेत उभे राहत आहेत.
उन्हामुळे नागरिक बेशुद्ध
शहराचे तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याने रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना चक्कर येण्याचे प्रकार घडत आहेत. "उन्हाची तीव्रता इतकी आहे की साधा पिण्याचा पाण्याचाही पत्ता नाही. सरकारने किमान गॅस तरी वेळेवर द्यावा, जेणेकरून जेवण तरी वेळेवर मिळेल," अशी मागणी महिला ग्राहकांकडून होत आहे.
ओटीपीचा तांत्रिक घोळ-
अनेकांना २७ एप्रिलला मिळालेले ओटीपी १ मे रोजी अचानक रद्द करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांना पुन्हा रांगेत उभे राहून नवीन ओटीपी घ्यावा लागत आहे. तांत्रिक कारणांमुळे नागरिकांचा कामाचा पूर्ण दिवस वाया जात असून आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे.
महत्वाचे मुद्दे:
लग्नाचा हंगाम: सध्या लग्नसराई सुरू असताना गॅस मिळत नसल्याने कुटुंब प्रमुख हवालदिल झाले आहेत.
होम डिलिव्हरी बंद: घरपोच सेवा मिळत नसल्याने नागरिक स्वतः टेम्पो किंवा रिक्षा करून लांबून सिलिंडर नेत आहेत.
मागणी: प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




