पुणे | भोर तालुक्यातील नसरापूर येथे ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या ६५ वर्षीय नराधमाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, खुद्द आरोपीच्या कुटुंबानेच त्याच्या कृत्याचा तीव्र निषेध केला असून, "त्याला फाशी नको, तर दगडाने ठेचून जिवंत जाळा," अशी आर्त आणि संतापजनक मागणी आरोपीच्या पत्नीने केली आहे.
पत्नीने फिरवली पाठ; १० वर्षांपासून संबंध तोडले
एका वृत्तवाहिनीशी बोलताना आरोपीच्या पत्नीने आपला संताप व्यक्त केला. "अशा नराधमाचे तोंडही पाहायची माझी इच्छा नाही. त्याचा अंतविधी झाला तरी मला कुणी सांगू नये. गेल्या १० वर्षांपासून आमचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही, पण त्याचे नाव आमच्या नावाशी जोडले गेल्याने आम्हाला समाजाचे बोल ऐकावे लागत आहेत," असे त्या म्हणाल्या. ज्या ठिकाणी त्या चिमुकलीची हत्या झाली, त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारावे, तरच माझ्या मनातील आग शांत होईल, अशा शब्दांत त्यांनी आपल्या पतीबद्दलचा तिरस्कार व्यक्त केला.
"मला बाप म्हणवून घेण्याची लाज वाटतेय" - मुलगा
आरोपीच्या मुलानेही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. "त्या चिमुकलीवर अमानुश अत्याचार करणाऱ्या त्या माणसाला माझे वडील म्हणवून घेताना मला लाज वाटत आहे. मला ११ भाचा-भाची आहेत, ती मुलगीही मला माझ्या भाचीसारखीच होती. आपण शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतो, येथे अशा नराधमांना कठोर शासन झालेच पाहिजे," अशी भावना त्याने व्यक्त केली.
गुन्हेगारीचा जुना इतिहास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा इतिहास अत्यंत काळा आहे. २०१५ मध्येही त्याने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता, ज्यामध्ये त्याला 'पोक्सो' अंतर्गत शिक्षा झाली होती. इतकेच नव्हे तर, यापूर्वी गावकऱ्यांनी त्याची धिंड काढून त्याला गावातून हाकलून दिले होते. आरोपीला स्वतःला सात मुली आहेत, तरीही त्याने हे पाशवी कृत्य केले. एका वृद्ध महिलेलाही त्याने आपल्या वासनेचा बळी बनवल्याची चर्चा परिसरात आहे.
नेमकी घटना काय?
१ मे रोजी या नराधमाने गावातील ४ वर्षीय चिमुकलीचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिची दगडाने ठेचून हत्या केली. तिचा मृतदेह त्याने शेणाच्या ढिगाऱ्याखाली गाडून टाकला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत. सध्या संपूर्ण परिसरातून आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी होत आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




