चेन्नई | तमिळनाडूच्या राजकीय पटलावर आजवर अनेक सिनेसतारे चमकले, पण सुपरस्टार थलपती विजय यांचा 'टीव्हीके' (TVK) पक्षाचा प्रवेश हा केवळ ग्लॅमरपुरता मर्यादित नसून तो प्रस्थापित सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरला आहे. विजयाने अत्यंत शांतपणे आणि नियोजित पद्धतीने आपल्या 'फॅन क्लब'चे रूपांतर एका शिस्तबद्ध राजकीय संघटनेत केले असून, त्याचा थेट परिणाम राज्याच्या व्होट बँकेवर होताना दिसत आहे.
२० वर्षांची सामाजिक तपश्चर्या
विजयाचा हा विजय एका दिवसाच्या करिष्म्यावर आधारलेला नाही. गेल्या दोन दशकांपासून त्यांच्या 'फॅन क्लब'च्या माध्यमातून तमिळनाडूच्या कानाकोपऱ्यात समाजकार्याचं भक्कम जाळं विणलं गेलं होतं. रक्तदान शिबिरं असोत की गरिबांना अन्न-वस्त्र पुरवणे, या कामांमुळे जनतेच्या मनात विजयाबद्दल 'आपला माणूस' ही भावना निर्माण झाली. विशेष म्हणजे, त्यांच्या फॅन क्लबची रचना एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणेच आहे, जिथे राज्य, विभाग आणि बूथ स्तरावर सक्षम कार्यकर्त्यांची फळी उभी आहे. २०२१ च्या स्थानिक निवडणुकांत त्यांच्या समर्थकांनी मिळवलेलं यश ही आगामी मोठ्या विजयाची नांदीच होती.
नवी व्होट बँक: अल्पसंख्याक आणि तरुणांचा आधार
विजयाने आपल्या राजकीय व्यासपीठावरून 'जोसेफ विजय' ही आपली ओळख ठळकपणे मांडत ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळवून घेतले आहे. आजवर 'द्रमुक'चा (DMK) बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या १२% मतदारांमध्ये विजयाने मोठी खिंडार पाडली आहे. सोबतच, 'फर्स्ट टाईम व्होटर्स' म्हणजेच तरुण पिढी आणि महिला मतदारांमध्ये विजयाची प्रचंड क्रेझ आहे. सुमारे २ कोटी तरुण आणि महिलांची मते थेट विजयाच्या पारड्यात पडत असल्याने प्रस्थापित पक्षांचे धाबे दणाणले आहेत.
लोककल्याणकारी आश्वासनांचा 'मास्टरस्ट्रोक
विजयाने आपल्या जाहीरनाम्यातून सामान्य जनतेच्या गरजांना हात घातला आहे. महिलांसाठी दरमहा २५०० रुपये भत्ता, मुलींच्या लग्नासाठी ८ ग्रॅम सोनं, बेरोजगारांना ४००० रुपयांचा भत्ता आणि ५ लाख तरुणांसाठी इंटर्नशिप यांसारख्या योजनांमुळे मध्यम आणि गरीब वर्गात त्यांच्याबद्दल मोठी आशा निर्माण झाली आहे.
चित्रपट सोडण्याचा धाडसी निर्णय
एमजीआर (MGR) यांच्यानंतर चित्रपटसृष्टीच्या शिखरावर असताना, 'लिओ' आणि 'गोट' सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे बाजूला सारून पूर्णवेळ राजकारणात उतरणारा विजय हा पहिलाच सुपरस्टार आहे. करिअरच्या शिखरावर असताना घेतलेला हा निर्णय त्यांच्या राजकीय
प्रामाणिकतेचा पुरावा मानला जात आहे.
थोडक्यात, केवळ पडद्यावरचा 'हिरो' न राहता, जमिनीवर उतरून लोकांचे प्रश्न सोडवण्याची तयारी केल्यामुळेच आज तमिळनाडूमध्ये 'थलपती' पर्व सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
शहर
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
महाराष्ट्र
- गोवा: नरकासूर प्रथेवर मंत्री सुदिन ढवळीकरांची आक्रमक भूमिका; राजकारणातील नरकासूर आधी बाजूला करा!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- जळगाव: न्यायाची दारे ग्रामीण जनतेसाठी खुली! ॲड. अनिकेत निकम यांच्या 'न्याय विश्वास फाउंडेशन'ची ५००० हून अधिक नागरिकांना मोफत कायदेशीर मदत!
- नांदेड: डोळ्यांदेखत कारसह पत्नी वाहून गेली! नांदेडमध्ये बहादरपुरा पुलावरून कार थेट नदीत कोसळली; पती बचावला, पत्नीचा शोध सुरू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: "मी सर्वोच्च न्यायालयाची दहादा माफी मागतो..."सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर खासदार संजय राऊतांनी मागितली माफी!
- उत्तर प्रदेश: भाजपाचा सपाला मोठा धक्का; तीन बक्षीसघाती बंडखोर आमदारांनी हाती धरले कमळ!
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?





























Subscribe to my channel




