
Amravati : शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या (QRT) शीघ्र कृती दलामधील एका जवानाने विजय दिलीप नागापुरे (वय ३५) यांनी काल बुधवारी रोजी सकाळी अत्यंत धक्कादायक पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली असून सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली
मिळालेल्या माहितीनुसार, विजय नागापुरे हे मंगळवारी रात्री नाईट ड्युटीवर होते. ड्युटी पूर्ण केल्यानंतर काल बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास त्यांनी पोलीस आयुक्तालयातील QRT कार्यालयात स्वतःच्या शासकीय पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, शाम घुगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेची माहिती सर्वप्रथम QRT मधील पोलीस कर्मचारी आकाश दिलीप अंबरते यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर संपूर्ण यंत्रणा हलली. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम व डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले असून तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. घटनास्थळावरून पिस्तुलमधील बुलेट जप्त करण्यात आली आहे.
पोलिस दलात खळबळ
मृतदेह पुढील तपासासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. विजय नागापुरे हे मूळचे मोर्शी तालुक्यातील धामणगाव काटपूर येथील रहिवासी होते. सध्या ते अमरावती शहरात कुटुंबासह राहत होते. ते २०१४च्या बॅचमध्ये पोलीस खात्यात रुजू झाले होते. त्यांच्या पश्चात कुटुंबीय असून त्यांचा भाऊ शाम नागापुरे हे देखील शहर पोलीस दलात कार्यरत आहेत. दरम्यान, आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलीस विभागाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
शहर
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
- पुणे: साडेसात सकाळी मॉर्निंग वॉल्कसाठी गेलेली ७३ वर्षीय महिला नदीपात्रात मृदअवस्थेत आढळली; काही तासांतच मृतदेहाची पटली ओळख
महाराष्ट्र
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- कोल्हापुर: लपंडाव खेळताना उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा स्पर्श होऊन ९ वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली



























Subscribe to my channel




