देशातील नामवंत UPSC मार्गदर्शक शुभ्रा रंजन यांच्याबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. त्यांच्याच एका माजी विद्यार्थ्याने आणि माजी बिझनेस पार्टनरने त्यांना भोपाळमध्ये ओलीस ठेवून तब्बल १ कोटी ९० लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भोपाळ गुन्हे शाखेने (Crime Branch) या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रियंक शर्मा याला अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रियंक शर्मा हा शुभ्रा रंजन यांचा माजी विद्यार्थी होता आणि त्यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये त्याने कामही केले होते. त्याने शुभ्रा रंजन यांना एका व्यावसायिक मीटिंगच्या बहाण्याने भोपाळला बोलावून घेतले. तिथे त्याने त्यांना एका ठिकाणी ओलीस ठेवले आणि धमकावून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल १.९० कोटी रुपये स्वतःच्या आणि आपल्या साथीदारांच्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले.
अशी झाली अटक:
गुन्हा केल्यानंतर अटकेच्या भीतीने आरोपी प्रियंक शर्मा हा एका खासगी रुग्णालयातील आयसीयू (ICU) मध्ये दाखल झाला होता. मात्र, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे भोपाळ गुन्हे शाखेने रुग्णालयातूनच त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंक शर्माला या कृत्यात इतर ५ ते ६ साथीदारांनी मदत केली असून, त्यापैकी काहींना पोलिसांनी अटक केली आहे.
कारणांचा तपास सुरू:
शुभ्रा रंजन यांनी याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली. प्रियंकने हा कट का रचला आणि यामागे आणखी काही मोठे रॅकेट आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, शैक्षणिक वर्तुळात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी यातील काही रक्कम गोठवल्याची (Freeze) माहितीही समोर येत आहे.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

