Pune : पुण्यात डम्परची दुचाकीला जोरदार धडक; आजोबा-नातीचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Pune : पाठीमागून आलेल्या डंपरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील आजोबांसह नऊ वर्षीय नातीचा मृत्यू झाला. हा अपघात ही घटना पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातील हातवे-तांभाड रस्त्यावर देऊळवाडीजवळ शनिवारी घडला. एकाच वेळी आजोबा आणि नात यांना दुर्दैवी अपघातात प्राण गमवावे लागल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आरोपी डम्पर चालक ताब्यात
शिवाजी नामदेव शिळीमकर (वय ६९) व तन्वी नितीन शिळीमकर (वय ९, दोघे रा. आरोह गार्डनजवळ, आंबेगाव रोड, पुणे, मूळ रा. तांभाड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात आकाश शिवाजी भुसने (रा. उबाळेनगर, वाघोली, ता. हवेली) या डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

नेमकं काय घडलं?
पोलिसांनी सांगितले, की शिवाजी शिळीमकर नात तन्वीसह आंबेगावमधून दुचाकीवरून गावी तांभाडला जात होते. देऊळवाडीजवळ पाठीमागून आलेल्या डंपरने (एमएच १४/ एचयू ३७७७) दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये शिवाजी व तन्वी गंभीर जखमी झाले.

स्थानिकांनी तातडीने दोघांना नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांकडे सोपवण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड तपास करीत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *