कल्पना करा की एखादी व्यक्ती सरकारी कार्यालयात जाऊन आपल्याला मिळणाऱ्या अनुदानाचे काय झाले, अशी विचारणा करते. किंवा ते एका विशिष्ट श्रेणीसाठी पात्र असल्याने ते सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी जातात. परंतु तेथील अधिकारी डोळे मिचकावत म्हणतात- “आमच्या नोंदींनुसार तुमचा खूप आधीच मृत्यू झाला आहे. म्हणून तुम्हाला काही लाभ मिळणार नाही.’ यावर तुमची प्रतिक्रिया कशी असेल? मला इतरांबद्दल माहिती नाही. परंतु कर्नाटकच्या बेळगावातील ५३ वर्षीय इरप्पा नागप्पा अब्बाई भेटणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला ओरडून म्हणत होते- “माझा मृत्यू झालेला नाही, जिवंत आहे.’ पण कुणीही त्यांना मदत करत नव्हते. कारण सरकारी नोंदींनुसार ते खूप पूर्वी मरण पावले आहेत. आज किंवा उद्या नाही, तर पाच वर्षांपूर्वी. हो. संघर्षाची ही खरी कहाणी बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील सुतगट्टी येथे राहणाऱ्या इरप्पा या एका लहान ऊस उत्पादक शेतकऱ्याची आहे. हे ठिकाण कर्नाटकची राजधानी बेंगळुरूपासून सुमारे ४५० किलोमीटर अंतरावर आहे. विशेष म्हणजे इरप्पा स्वतः त्यांना सहा महिन्यांपूर्वीच कळले की त्यांचे नाव २०२१ मध्ये सरकारी नोंदींमधून वगळण्यात आले होते. त्यांचा मृत्यू रेकॉर्डवर कसा आला हे तुम्हाला आश्चर्य वाटत आहे का? ही कथा आहे. इरप्पांचा मुलगा २०२१ मध्ये मरण पावला. त्यांच्या मुलाचा मृत्यू दाखला तयार करताना गावच्या अधिकाऱ्याने चुकून त्यांच्या वडिलांचीही मृत म्हणून नोंद केली. मृत्युपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याने इरप्पा यांना विचारले की त्यांचे मृताशी काय नाते आहे. इरप्पांनी ते त्यांचे वडील असल्याचे स्पष्टीकरण देऊनही अधिकाऱ्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्या वडिलांनाही मृत म्हणून नोंदवले. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलाला गमावलेल्या इरप्पा त्या दिवशी त्यांच्या स्वतःच्या मृत्यूची नोंद झाली आहे हे त्यांना माहिती नव्हते. २०२५ च्या मध्यात इरप्पा सरकारी ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करण्याशी संबंधित कागदपत्रे मिळवण्यासाठी जिल्ह्याच्या लघुसिंचन कार्यालयात गेले. त्यांचा अर्ज मंजूर झाला असता तर त्यांना ३ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकले असते. अनुदान मंजूर झाले. परंतु इरप्पा यांना आर्थिक मदत मिळण्यात एक अधिकृत नोंद अडथळा ठरली. त्यात असे म्हटले होते की ते मृत व्यक्तीचे पुत्र होते. त्यांचेही ८ जुलै २०२१ रोजी निधन झाले. त्यामुळे त्यांना कोणत्याही सरकारी लाभांसाठी अपात्र ठरवण्यात आले. गेल्या पाच महिन्यांपासून इरप्पा नावाचा हा शेतकरी आपली कैफियत घेऊन सरकारी कार्यालयांत खेटे मारत आहे. मला स्पर्श करून बघा. मी जिवंत आहे की नाही पाहावे, असे आर्जव तो लोकांकडे करत आहे - असा विरोधाभास क्वचितच कुणी अनुभवला असेल. आजही त्यांना आपण जिवंत आहोत, हे सिद्ध करण्याचे अविश्वसनीय काम करावे लागत आहे. म्हणजेच आपण चालते-बोलते भूत नाही, हे सांगावे लागत आहे. त्यांच्या घरापासून तहसीलदारांच्या कार्यालयापर्यंत त्यांना खेटे मारावे लागतात. त्यासाठी दीड तास लागतो. हा काळ चिंता आणि अनिश्चिततेने भरलेला असतात. आपण जिवंत परतू की नाही असा विचार करून ते घराबाहेर पडतात. तुम्ही विचार करत आहात तसे मला म्हणायचे नाही. सरकार त्यांचे अस्तित्व मान्य करेल का, असा प्रश्न आहे. प्रत्येक वेळी अधिकारी त्यांना सांगतात, अशा सुधारणांसाठी एक औपचारिक प्रक्रिया आहे. ती स्थानिक पातळीवर लगेच करता येत नाही. तहसीलदारांनी त्यांचा अर्ज स्वीकारला असून प्रक्रिया सुरू केली आहे. हा अहवाल जिल्हा सांख्यिकी कार्यालय आणि तेथून बेंगळुरूला पाठवला आहे. संपूर्ण प्रक्रियेला आणखी एक महिना लागू शकतो.
फंडा असा की- या कटू अनुभवातून एक धडा घेतला पाहिजे की अशा बेजबाबदार सरकारी विभागांकडून कोणतेही काम करून घेत असाल तेव्हा आपण दिलेली माहिती त्या प्रणालीत अचूकपणे समाविष्ट झाली किंवा नाहीची खात्री करा. अन्यथा, इरप्पा यांच्यासारखी चपला झिजवण्याची वेळ येऊ शकते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




