
Latur : राज्यामध्ये महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशीच एक घटना लातूर जिल्ह्यात उघड झाली आहे. कॅफेच्या नावाखाली लॉजिंग चालवण्याचा आरोप लावत दोन जणांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक बातमी समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीसह दोन कॅफेचालकांना सुद्धा अटक केली असल्याची माहिती आहे. संबंधित कॅफेचालकांनी आरोपीवर मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता, अटक झालेल्या आरोपींची चौकशी करून पुढील तपास केला जात असल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित घटना ही 4 डिसेंबर रोजी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांच्या तपासादरम्यान, रिहान गुलाब शेख (18) नावाच्या एका तरुणाने पीडितेला फूस लावून पळवून नेल्याचं समोर आलं. त्यानंतर, तिच्यावर आरोपीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले.
|
|
तसेच, मुलीवर अत्याचार करण्यासाठी तिला शहरातील कॅफे डेली ग्राइंड आणि एस. पी. कॅफे डेअर याठिकाणी नेण्यात आल्याचं निष्पन्न झालं. ही माहिती समोर येताच पोलिसांनी सूरज राजेश ढगे आणि अनिकेत अजय कोटुळे या कॅफेचालकांना ताब्यात घेतलं. या दोघांवर सुद्धा पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणातील मुख्य आरोपी रिहान शेख याला पोलिसांनी 4 डिसेंबर रोजी अटक केली आहे. त्याच्यासाठी 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळवण्यात आली. तसेच, या घटनेतील इतर दोन आरोपी असलेल्या कॅफेचालकांना 5 डिसेंबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. न्यायालयाकडून 8 डिसेंबरपर्यंत पीसीआर मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे.
याव्यतिरिक्त, अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या तसेच आरोपींना कोणत्याही प्रकारे मदत करणाऱ्या कॅफे, लॉज किंवा हॉटेल मालकांवर पोक्सो अॅक्ट अंतर्गत करवाई केली जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




