
Mumbai : देशातील पहिला एक्सप्रेस वे अर्थात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Yashwantrao Chavan Expressway) गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे या प्रवासाला अधिक वेळ लागतोय. आता सरकारकडून द्रुतगती महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून (state government) तब्बल १४२६० कोटींचा मेगाप्लान तयार करण्यात आला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आता आणखी ४ लेन वाढण्यात येणार आहे. ९५ किमीचा हा महामार्ग सध्या सहापदरी आहे. पुढील काही वर्षांत हा महामार्ग दहा पदरी होईल. त्यामुळे मुंबई आणि पुणे या दोन शहरातील प्रवास आणखी सुपरफास्ट होईल.
९५ किलोमीटर लांबीच्या मुंबई-पुणे या द्रुतगती मार्गावर आणखी चार पदरी मार्ग जोडण्यासाठी १४,२६० कोटी रुपये इतका अंदाजे खर्च येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने प्रसारमध्यमान सोबत बोलताना सांगितले. याबाबत एमएसआरडीसीकडून ( महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्य सरकारने चार लेन वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर केला. तर निविदा प्रक्रिया नियोजनानुसार पार पडतील. आणि २०३० पर्यंत एक्सप्रेसवेमध्ये चार नवीन लेन जोडल्या जातील, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितलेय.
|
|
मुंबई-पुणे या दोन शहरांना जोडणारा एक्सप्रेस वे १ एप्रिल २००२ रोजी सर्वसामान्यांसाठी खुला झाला. या द्रुतगती महामार्गावर सध्या सहा लेन आहे. मुंबई आणि पुणे या दोन शहरात प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या महामार्गावर दररोज ८० हजार ते एक लाख वाहनांची वाहतूक असते. विकेंडला अथवा सुट्ट्यांच्या काळात ही वाहतूक आणखी वाढते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे समोर आले आहे. वाहतूककोंडी फोडण्यासाठी २०२० मध्ये महामार्गावरील १९० वर्षे जुना अमृतांजन पूल पाडण्यात आला. पण वाहतूककोंडी काही कमी झाली नाही. त्यामुळे या महामार्गावर आणखी चार लेन वाढवण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
अडोशी बोगद्यापासून खंडाळा एक्झिटपर्यंतचा हा मार्ग सहा पदरी आहे. पण एक्सप्रेस वेचे सहा पदरी आणि जुना मुंबई-पुणे महामार्गाचे चार पदरी, असे महामार्ग १० पदरी वाहतुकीची सुविधा देतो, असे अधिकाऱ्याने सांगितले. मागील शुक्रवार-शनिवारी या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी दिसून आली. पाच ते दहा किमीच्या रांगा लागल्या होत्या. अनेकांनी सोशल मीडियावर याबाबतचा राग व्यक्त केला आहे. एका युजर्सने मुंबई-पुणे या प्रवासासाठी आठ तास लागल्याची तक्रार केली. तर दुसरा एक व्यक्ती म्हणाला की, यापेक्षा कमी वेळ जुना मुंबई-पुणे एक्सप्रेसवेने लागतो. त्याशिवाय टोलही कमी द्यावा लागतो. आपण नेमकी प्रगती करतो की मागे पडतोय, असा प्रश्न पडला आहे.
वाढती वाहतूककोंडी पाहून २०२० मध्ये हा महामार्ग आठ पदरी करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता एमएसआरडीसीने १० लेनपर्यंत सुधारित प्रस्वात तयार केला आहे. वाढत्या वाहतुककोंडीमुळेच नव्हे तर मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे आणखी वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला हा एक्सप्रेसवे अपग्रेड करण्याची आवश्यकता असल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने म्हटलेय. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेला आणखी चार लेन जोडण्यासाठी १४,२६० कोटी रुपयांचा अंदाजे खर्च येणार आहे. त्यापैकी राज्य सरकार ४०% योगदान देण्याची शक्यता आहे तर उर्वरित रक्कम निविदा देणार्या कंपनीकडून उचलली जाण्याची शक्यता आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!


























Subscribe to my channel




