
Pune : पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील मिळकतकरावरून आता वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने स्पष्ट आदेश दिला आहे की, या गावांमधील मिळकतकर हा ग्रामपंचायतीच्या दुपटीपेक्षा जास्त असू नये. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेचा कर आणि राज्य सरकारच्या करांचा मिळून भार वाढल्याने ही रक्कम दुपटीपेक्षा जास्त होत आहे.
यात निवासी मिळकतींवर अडीच ते पावणेतीन पटपर्यंत करवाढ होणार असली तरी सर्वसामान्य नागरिकांचा विरोध दिसत नाही. परंतु व्यावसायिक आणि अनधिकृत बांधकाम असलेल्या मिळकतींवर सहा ते आठ पट कर आकारला जाणार असल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या श्रेणीतील मिळकती सुमारे २७ हजार असून, त्यांचा कर कमी करणे अवघड असल्याने करआकारणीचा निर्णय रखडला आहे.
|
|
२०१७ मध्ये ११ गावे आणि २०२१ मध्ये २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाली होती. त्यातील फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे वगळण्यात आल्याने सध्या ३२ गावे महापालिकेच्या हद्दीत आहेत. मात्र, या गावांमध्ये अद्याप रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था आणि वीज यासारख्या मूलभूत सोयी नीट उपलब्ध नसतानाही नागरिकांवर जास्त कराचा बोजा पडत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळाने थकबाकी व दंड वसुलीला स्थगिती दिली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी नगरविकास विभागाने पुन्हा आदेश काढून, ग्रामपंचायतीच्या मालमत्ता कराच्या दुपटीपेक्षा जास्त कर आकारू नये, असा निर्णय कायम ठेवला.
खडकवासला, पुरंदर, हडपसर, भोर आणि वेल्हा या विधानसभा मतदारसंघांतील ३२ गावांमध्ये मिळून सुमारे साडेचार ते पाच लाख मतदार आहेत. त्यामुळे या निर्णयाचा थेट राजकीय परिणामदेखील दिसून येत आहे.
दरम्यान, निवडणुकांनंतर करनिश्चितीवर चर्चा झाली असली तरी तोडगा अद्याप निघालेला नाही. महापालिकेच्या अभ्यासानुसार, कर दुपटीपेक्षा जास्त असला तरी तो पावणेतीन पटांपेक्षा अधिक नाही, अशी माहिती राज्य सरकारला देण्यात आली आहे.
महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या मते, सामान्य नागरिक कर भरण्यास तयार आहेत, परंतु मोठे व्यापारी, गोडाऊन मालक, राजकीय पदाधिकारी आणि जमीनदार यांच्या व्यावसायिक मिळकतींवर कर वाढल्यामुळे त्यांच्याच विरोधामुळे निर्णय रखडत आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




