
Delhi :आम आदमी पार्टी (AAP) मध्ये नुकत्याच झालेल्या फेरबदलानंतर राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यसभेतील उपनेते पदावरून हटवल्यानंतर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत थेट पक्षालाच सवाल केला आहे.
“माझ्या शांततेचा अर्थ माझा पराभव समजू नका. मला गप्प करण्यात आले आहे, पण मी हरलेलो नाही,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.
‘जनतेचे मुद्दे मांडणे हा गुन्हा आहे का?’
राघव चड्ढा यांनी व्हिडिओमध्ये प्रश्न उपस्थित करत म्हटले,
“मला जेव्हा जेव्हा संसदेत बोलण्याची संधी मिळते, तेव्हा मी जनतेचे मुद्दे मांडतो. जनतेचे प्रश्न मांडणे हा गुन्हा आहे का? मी काही पाप केले आहे का?”
त्यांनी आरोप केला की, पक्षाकडूनच संसदेत त्यांना बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला.
‘मी नेहमी सामान्य माणसासाठीच बोललो’
आपल्या कामगिरीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, संसदेत त्यांनी अनेक महत्त्वाचे विषय मांडले—
* एअरपोर्टवरील महागाई
* डिलिव्हरी रायडर्सच्या समस्या
* अन्नातील भेसळ
* टोल प्लाझा व बँक चार्जेस
* मध्यमवर्गीयांवरील करांचा बोजा
* टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्ज धोरणांवरील प्रश्न
“हे सर्व मुद्दे मांडल्यानंतर सामान्य नागरिकाचा फायदा झाला, मग पक्षाचे नुकसान नेमके कुठे झाले?” असा सवालही त्यांनी केला.
‘माझा आवाज का दाबला जातोय?’
राघव चड्ढा यांनी भावनिक स्वरात म्हटले,
“कोणाला मला बोलण्यापासून रोखायचे आहे? माझा आवाज का दाबला जातोय?”
जनतेला उद्देशून त्यांनी समर्थन कायम ठेवण्याचे आवाहनही केले—
“मी तुमच्यामुळे आहे आणि तुमच्यासाठीच आहे. माझा हात सोडू नका.”
‘मी सागर आहे… वेळ आल्यावर वादळ बनेन’
व्हिडिओच्या शेवटी त्यांनी ठाम इशारा देत म्हटले—
“माझ्या शांततेला माझा पराभव समजू नका. मी तो सागर आहे, जो वेळ आल्यावर वादळ बनतो.”
AAP मधील मोठा बदल
आम आदमी पार्टी ने राज्यसभेत संघटनात्मक फेरबदल करत राघव चड्ढा यांना उपनेते पदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी आता अशोक कुमार मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राघव चड्ढा यांचा राजकीय प्रवास
* 2020–2022 : दिल्ली विधानसभेचे आमदार
* दिल्ली जल बोर्डमध्ये सदस्य म्हणून काम
* एप्रिल 2022 : पंजाबमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड
ही संपूर्ण घडामोड आगामी काळात आम आदमी पार्टी मधील अंतर्गत राजकारणाला नवा वळण देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

