
Pune : मुंबईतील सांताक्रुझ पूर्व येथील कलिना परिसरात काल नवीन वर्षाच्या रात्री एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका महिलेनं चक्क आपल्या प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची घटना समोर आली असून, या हल्ल्यात 44 वर्षीय पुरुष गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जखमी व्यक्तीचं नाव जोगिंदर लखन महतो (वय 44) असून ते जांभळीपाडा परिसरात राहत असून खासगी वाहनचालक म्हणून काम करतात. गेल्या 18 वर्षांपासून ते कुटुंबासह या भागात वास्तव्यास आहेत. पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, जोगिंदर यांचे त्यांच्या बहिणीच्या नणंदेसोबत म्हणजेच कंचनदेवी राकेश महतो (वय 25) हिच्यासोबत गेल्या सहा ते सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
|
BMC Election : मुंबईतील धक्कादायक प्रकार, भाजप इच्छुक उमेदवाराने जोडला डुप्लीकेट AB फॉर्म |
कुटुंबात वारंवार वाद
कंचन ही जोगिंदर यांच्यावर पत्नीला सोडून तिच्यासोबत राहण्याचा व लग्न करण्याचा दबाव टाकत होती. या कारणामुळे जोगिंदर यांच्या कुटुंबात वारंवार वाद होत होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने नोव्हेंबर 2025 मध्ये जोगिंदर मुंबई सोडून बिहारला गेले होते. मात्र, त्या काळातही कंचन सतत फोन करून मुंबईत परत येऊन लग्न करण्याची धमकी देत असल्याचा आरोप जोगिंदर यांनी केला आहे. 19 डिसेंबर 2025 रोजी जोगिंदर पुन्हा मुंबईत परतले. मात्र, त्यांनी कंचनपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.
31 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 1.30 वाजता कंचनने नववर्षानिमित्त मिठाई देण्याच्या बहाण्याने जोगिंदरला आपल्या घरी बोलावले. त्यावेळी घरात कंचन आणि तिची दोन लहान मुले उपस्थित होती. मुले झोपल्यानंतर कंचनने स्वयंपाकघरातील भाजी कापण्याच्या चाकूने जोगिंदर यांच्यावर हल्ला करून त्यांचा प्रायव्हेट पार्ट कापला.गंभीर जखमी अवस्थेत जोगिंदर कसेबसे आपल्या घरी पोहोचले आणि संपूर्ण प्रकार कुटुंबीय व शेजाऱ्यांना सांगितला. त्यानंतर त्यांना तातडीने आधी देसाई रुग्णालयात, त्यानंतर पुढील उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वाकोला पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. जोगिंदर यांच्या तक्रारीवरून आरोपी कंचनदेवी महतो हिच्याविरोधात गंभीर दुखापत व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- पुणे: गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना अचानक चक्कर आल्याने पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे यांचे हृदयविकाराने निधन
- परभणी: पालममधील दोन तरुण गोदावरी नदीत बुडाले, गणेश विसर्जनादरम्यान धानोरा काळे येथे घडली दुर्दैवी घटना
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!




























Subscribe to my channel




