छत्रपती संभाजीनगर: शहरातील गारखेडा परिसरातील साईनगर भागातून हत्येची एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. बहिणीशी बोलण्यावरून आणि संशयास्पद वादातून एका १९ वर्षीय तरुणाची घरात घुसून अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण गारखेडा परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नक्की काय घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुणाचे नाव तौसिफ शमीम शेख (वय १९, रा. साईनगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर) असे आहे. तो सेंट्रिंगचे काम करून आपल्या आई-वडिलांना आणि कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होता. तर आदित्य शेळके (रा. साईनगर, गारखेडा परिसर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. मयत तरुणाचा चुलत भाऊ मुजम्मील जमील शेख याने दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी आदित्य शेळके याने तौसिफसोबत 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते' अशा संशयास्पद कारणावरून जोरदार वाद घातला होता. या वादानंतर निघून जाताना आरोपीने तौसिफला 'आज तुला सोडणार नाही' अशी उघड धमकी दिली होती.
रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तरुण
धमकी दिल्यानंतर काही वेळातच संतापलेला आदित्य तौसिफच्या घरात घुसला आणि त्याने अचानक धारदार चाकूने तौसिफवर प्राणघातक हल्ला केला. चाकूच्या जोरदार वारांमुळे तौसिफ गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. तरीही आरोपीचा राग शांत झाला नाही; त्याने खाली पडलेल्या तौसिफच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर चाकूने सपासप वार करणे सुरूच ठेवले.
कुटुंबीयांचा आणि आजूबाजूच्या नातेवाईकांचा आरडाओरडा ऐकून लोक मदतीसाठी धावून आले. लोक जमा होत असल्याचे पाहताच आरोपी आदित्य शेळके घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या तौसिफला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा करुण अंत झाला होता. एकाच क्षणात आपल्या पोटच्या लेकाला गमावल्यामुळे आई-वडिलांना प्रचंड धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गुन्हा दाखल केला असून आरोपीचा कसून शोध सुरू केला आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




