आष्टी (जि. बीड): बीड जिल्ह्यातील आष्टी पोलीस ठाण्याच्या आवारातच कायद्याचे धिंडवडे निघाल्याची एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पोलीस ठाण्याच्या आतच एका महिला कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून, आरोपींनी तिची विनयभंग करत तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत हल्ला करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आष्टी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस अंमलदारावर हा हल्ला झाला. कौटुंबिक किंवा वैयक्तिक वादाच्या पार्श्वभूमीवर आरोपी आष्टी पोलीस ठाण्यात आले होते. पोलीस ठाण्याच्या आवारातच आरोपींनी महिला कर्मचाऱ्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता हा वाद विकोपाला गेला. यावेळी संतापलेल्या आरोपींनी महिला पोलिसाचा विनयभंग केला आणि अत्यंत निर्घृणपणे तिच्या गळ्यातील ओढणीने तिचा गळा आवळण्यास सुरुवात केली.
पोलीस ठाण्याच्या आत घडत असलेला हा जीवघेणा प्रकार पाहून तिथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने मध्यस्थी करून महिला कर्मचाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींचा राग एवढा अनावर झाला होता की, त्यांनी मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीलाही जबर मारहाण केली आणि त्याला चावा घेऊन गंभीर जखमी केले. पोलीस ठाण्यात सुरू असलेल्या या आरडाओरड आणि गदारोळामुळे इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत आरोपींना जागीच ताब्यात घेतले.
पोलिसांकडून तिघांना अटक आणि कायदेशीर कारवाई:
या भीषण घटनेनंतर आष्टी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. महिला पोलिसावर प्राणघातक हल्ला करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, विनयभंग करणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणे यांसारख्या विविध गंभीर कलमांन्वये एकाच कुटुंबातील तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस ठाण्यातच खाकी वर्दीवर झालेल्या या हल्ल्यामुळे पोलीस दलासह संपूर्ण बीड जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यासारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणीच जर महिला पोलीस कर्मचारी सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांचे काय, असा गंभीर सवाल या घटनेमुळे उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे.
शहर
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- पुणे: अशा घटना खपवून घेणार नाही; शिवाजीनगर कोर्टातील मंदार किवळे हल्ल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, पोलीस महासंचालकांना खडसावले!
महाराष्ट्र
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- सातारा: शेतीकडे केवळ व्यवसाय नव्हे, उद्योजकतेची संधी म्हणून पाहा; कराडच्या कृषी महोत्सवात सुनेत्रा पवार यांचे तरुणाईला आवाहन!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
गुन्हा
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- नागपुर: सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगलात १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; मित्राला मारहाण करून पळवले, नागपूर हादरले!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार; जखमी मंदार किवळेचा थरारक पहिला जबाब समोर!
- अमरावती: इर्विन रुग्णालय परिसरात कापलेले दोन हात, एक पाय आणि डोके आढळल्याने खळबळ!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
























Subscribe to my channel




