ठाणे: ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील अत्यंत गजबजलेल्या नौपाडा (Naupada) भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गोखले रोडवर असलेल्या प्रसिद्ध गावदेवी भाजी मार्केट (Gaondevi Vegetable Market) इमारतीला आज पहाटे भीषण आग लागली. या अग्नितांडवात भाजी मार्केट आणि कपड्यांच्या दुकानांचे तब्बल १५० गाळे जळून खाक झाले आहेत. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे, या दुर्घटनेत कर्तव्य बजावताना ठाणे महानगरपालिकेच्या एका धाडसी अग्निशामक अधिकाऱ्यासह एका सुरक्षारक्षकाचा होरपळून व श्वास गुदमरून मृत्यू झाला आहे, तर इतर दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास आगीचे तांडवमिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ३:४३ वाजण्याच्या सुमारास गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाजवळील मार्केट इमारतीमधून अचानक आगीच्या ज्वाला निघताना दिसल्या.
स्थानिक नगरसेवकांनी तातडीने याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला (RDMC) दिली. लाकडी फळ्या, प्लास्टिक शीट्स आणि कपड्यांच्या साठ्यामुळे आग काही मिनिटांतच संपूर्ण मार्केटमध्ये पसरली आणि भीषण स्वरूप धारण केले.वाचवताना स्वतःचाच गेला जीव; दोघांचा मृत्यूया आगीच्या घटनेत बचावकार्य करत असताना मोठी शोकांतिका घडली. इमारतीमध्ये ठाणे महानगरपालिकेचे आरक्षक (सुरक्षारक्षक) काळू शंकर गाडेकर (वय ५३) हे अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी आणि आग विझवण्यासाठी अग्निशमन केंद्राचे स्थानक अधिकारी सागर शिंदे (वय ४३) यांनी जीवाची परवा न करता धुराच्या लोटात प्रवेश केला. मात्र, इमारतीमध्ये विषारी वायू आणि धूर प्रचंड प्रमाणात पसरल्यामुळे या दोघांचाही गुदमरून आणि होरपळून अत्यंत दुर्दैवी अंत झाला. याशिवाय, आग विझवताना अग्निशमन विभागातील स्थानक अधिकारी सुजित पष्टे (वय ४५) आणि तांडेल समीर जाधव (वय ४०) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोठी यंत्रणा घटनास्थळी; व्यापाऱ्यांचे नुकसानआगीची भीषणता
पाहता अग्निशामक दलाच्या ५ गाड्या, ३ जम्बो वॉटर टँकर, २ नेहमीचे वॉटर टँकर, ४ रेस्क्यू वाहने आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नौपाडा पोलीस आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून वीजपुरवठा खंडित केला. तब्बल ४ ते ५ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले.या आगीमुळे १५० हून अधिक व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस आणि अग्निशमन विभाग या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय


























Subscribe to my channel





https://shorturl.fm/bFxpG