
Jalgaon : जळगाव-भुसावळ महामार्गावर इनोव्हा कारचा काल रात्री भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की समोरील कारने डिव्हायडर तोडून समोरून येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली आणि वाहनाचा अक्षरश: पुढच्या गाडीचा चुराडा झाला. या अपघातात एक तरुणी ठार झाली असून एक जण जखमी आहे.
अपघात कसा झाला?
गाणी ऐकत गप्पा मारत महामार्गावरुन जात असताना अचानक असं काही घडलं की कारने थेट स्पीड घेतला, डिव्हायडर सोडून ती पलिकडच्या लेनमध्ये गेली आणि समोरुन येणाऱ्या कंटेनरवर धडकली. कंटेनरने कारला चिरडलं आणि काही अंतर पुढे फरफटत नेलं. हा अपघात इतका भयंकर होता की इनोव्हा गाडीचा अक्षरश: चुराडा झाला आहे. जळगाव-भुसावळ महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
|
|
जळगाववरून भुसावळच्या दिशेनं एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार वेगाने जात होती. कारमध्ये झोया नदीम पठाण (वय 22) आणि अर्बन खान (वय 26) हे दोघे प्रवास करत होते. प्रवास अगदी आनंदात सुरू होता. दोघांच्याही गप्पा सुरू होत्या, गाडीमध्ये गाणे सुरू होते. गाडीचा स्पीडही वेगात होता. पण दोघांच्या आनंदात विरजण पडलं आणि गाडीचा ताबा सुटला. गाडी अनियंत्रित झाली वेगात असलेल्या या कारने महामार्गावरील डिव्हायडर अक्षरशः तोडला आणि ती थेट विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये घुसली. त्या गाडी समोरून एक अवजड कंटेनर येत होता, काळाने जणू तिथेच सापळा रचला होता.
अवघ्या 22 वर्षाच्या मुलीचा अंत
कंटेनर आणि इनोव्हाची समोरासमोर इतकी भीषण धडक झाली की, कारच्या पुढचा भागाचा चुराडा झाला. लोखंडाच्या पत्रामध्ये झोया आणि अरबान दोघेही अडकून पडले होते. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की, आजूबाजू असणाऱ्या लोकांनी धावत घटनास्थळ गाठलं. गाडीची अवस्था पाहूनच काळजाचा ठोका चुकला. दुर्दैवाने या धडकेत झोया पठाण हिचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या 22 वर्षाच्या मुलीचा असा करून अंत पाहून जळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहेत. तिच्यासोबत अर्बन खान हा रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत होता. स्थानिक तरुणांनी तात्काळ त्याला बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलवले. सध्या त्याची प्रकृती गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel





1 thought on “Jalgaon : गाणी ऐकत आनंदात प्रवास सुरू असतानाच भीषण अपघात; कारचा ताबा सुटून डिव्हायडर तोडत कंटेनरला धडक, झोयाचा जागीच दुर्दैवी अंत”