पुणे: शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना दररोज अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. मात्र, या कामादरम्यान त्यांना सातत्याने स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांच्या त्रासाला आणि दबावाला सामोरे जावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राजकीय नेत्यांच्या मनमानी मागण्यांनुसार काम न केल्यास दंडात्मक कारवाई किंवा तडकाफडकी बदली करण्याची धमकी दिली जाते. एका प्रभागात एका नगरसेवकाचे किंवा पदाधिकाऱ्याचे ऐकल्यास दुसरा नेता नाराज होतो आणि प्रामाणिकपणे काम करूनही कर्मचाऱ्यांविरोधात खोड्या करून तक्रारी केल्या जातात. या राजकीय त्रासाला वैतागून अनेकदा कर्मचाऱ्यांना दुसऱ्या प्रभागात बदली करून घ्यावी लागते, असे उद्विग्न गाऱ्हाणे पुणे महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासमोर थेट मांडले.
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या या व्यथा ऐकून पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. "शहर अधिक स्वच्छ कसे राहील, याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेची असून त्यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शहर स्वच्छतेच्या कामात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप अजिबात खपवून घेतला जाणार नाही," असा स्पष्ट आणि कडक इशारा आयुक्तांनी दिला. तसेच, काम करत असताना कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्याकडून किंवा नेत्याकडून धमकावले जात असल्यास किंवा मानसिक त्रास दिला जात असल्यास कर्मचाऱ्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे खंबीर आश्वासन त्यांनी दिले.
'स्वच्छ संवाद' कार्यक्रमात कर्मचाऱ्यांनी मांडल्या अडचणी
पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने या विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी, निरीक्षक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी 'स्वच्छ संवाद' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महापालिका आयुक्त राम यांनी उपस्थित स्वच्छता कर्मचारी व अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या दैनंदिन कामातील समस्या जाणून घेतल्या. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर वाढत असलेल्या राजकीय दबावाबद्दल संताप व्यक्त करत, महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहावे, अशी जोरदार अपेक्षा व्यक्त केली.
"स्वच्छतेचा धडा गिरवण्यासाठी इंदूरला जावे लागणे विचार करायला लावणारे"
यावेळी बोलताना आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासनाच्या आणि नागरिकांच्या कामगिरीवरही बोट ठेवले. ते म्हणाले, "पुणे शहरात स्वच्छतेसाठी दरवर्षी मोठा निधी खर्च केला जातो आणि प्रचंड काम केले जाते, तरीही महापालिकेवर सतत टीका होते. एवढे काम करूनही आपण अद्याप पुणेकर नागरिकांचा पूर्ण विश्वास संपादन करू शकलो नाही. शहरात प्लास्टिकबंदीचे कठोर नियम असूनही प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू आहे. मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी कोट्यवधींचे प्रकल्प राबवले जात असले, तरी नदीचे पाणी काळेच दिसते. त्यामुळे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला अधिक नियोजनबद्ध आणि प्रभावी काम करण्याची गरज आहे."
पुढे बोलताना आयुक्त म्हणाले, "पुणे शहराला मोठी ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक परंपरा आहे. शहराकडे आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा आणि क्षमता उपलब्ध आहेत. तरीही शहराला स्वच्छतेचा धडा गिरवण्यासाठी दरवेळी इंदूरला जावे लागते, ही बाब खरंच गंभीरपणे विचार करायला लावणारी आहे. शहर नक्की कधी स्वच्छ होणार, याची चर्चा आपण आणखी किती वर्षे करत राहणार आहोत?" असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.
कामात शिस्त आणि समन्वयाचे निर्देश
काही कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचे नावही खराब होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कामाच्या वेळेत पूर्ण निष्ठेने जबाबदारी पार पाडली पाहिजे. अतिरिक्त कामाचा ताण घेण्यापेक्षा नेमून दिलेले काम उच्च दर्जाचे करा, असे आवाहन त्यांनी केले. शहर स्वच्छतेच्या कामात कोणीही लहान किंवा मोठा नाही, सर्वांचे योगदान समान महत्त्वाचे आहे. महापालिकेच्या विविध विभागांमध्ये परस्पर समन्वय असणे अत्यंत आवश्यक असून, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई अधिक प्रभावी करा आणि नागरिकांनाही स्वच्छतेच्या सवयींचे महत्त्व पटवून द्या, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
शहर
- मुंबई: पर्यावरणाला धक्का! पुनर्विकास प्रकल्प आणि रुग्णालयाच्या बांधकामासाठी तब्बल १८२ झाडे तोडण्यास मंजुरी!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी: नाशिक अन् त्र्यंबकेश्वरमध्ये 'हर घर भगवा' अभियानांतर्गत फडकणार १ लाख भगवे ध्वज!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील सांस्कृतिक चळवळीला मोठा धक्का! दोन प्रमुख नाट्यगृहं बंद राहिल्याने आयोजकांची प्रचंड वणवण!
- नाशिक: वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा एमबीबीएसच्या प्रथम वर्षासाठी ५ संधी आणि १० वर्षांत कोर्स पूर्ण करण्याची अट लागू!
महाराष्ट्र
- मुंबई: पर्यावरणाला धक्का! पुनर्विकास प्रकल्प आणि रुग्णालयाच्या बांधकामासाठी तब्बल १८२ झाडे तोडण्यास मंजुरी!
- कोल्हापूर: गोकुळ'च्या अध्यक्षपदाची निवड २९ ऑक्टोबरला! शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव निश्चित; फुटीच्या भीतीने काँग्रेस संचालक सहलीवर जाणार!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी: नाशिक अन् त्र्यंबकेश्वरमध्ये 'हर घर भगवा' अभियानांतर्गत फडकणार १ लाख भगवे ध्वज!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील सांस्कृतिक चळवळीला मोठा धक्का! दोन प्रमुख नाट्यगृहं बंद राहिल्याने आयोजकांची प्रचंड वणवण!
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: नागरिकांना मोठा दिलासा जमीन आणि वनाशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही!
- दिल्ली: बॉन्ड तोडण्याचं आणि रेजीम चेंजचे नारे देण्याचं कारण काय? जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान दिल्ली हायकोर्टाने सीजेपी नेत्यांना चांगलेच धारेवर धरले!
- नवी दिल्ली: राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ जगन मोहन रेड्डींनी निवडणूक आयुक्त निवडीच्या प्रक्रियेवर उठवले प्रश्न; जुन्या निर्णयावर व्यक्त केला पश्चात्ताप!
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!


























Subscribe to my channel




