
Pimpri : जगताप कुटुंबातील दीर-भावजयीमधील गृहकलह मिटला आहे. आमदार अश्विनी जगताप यांनी माघार घेतली असून, त्यांच्यासह माजी नगरसेवकांनी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे भाजपपुढील डोकेदुखी कमी झाली असून, शंकर जगताप यांचा चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघावर निर्मितीपासून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे वर्चस्व राहिले. २०२३ मध्ये त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पत्नी अश्विनी आणि बंधू शंकर जगताप यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच झाली होती. दोघांनीही उमेदवारी मागितली होती; परंतु पक्षश्रेष्ठींनी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आणि त्या विजयी झाल्या. महाविकास आघाडीतील राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्याने तिरंगी लढत झाली. त्यामुळे जगताप ३६ हजार मतांनी विजयी झाल्या. सहानुभूती आणि बंडखोरी जगताप यांच्या पथ्यावर पडली; मात्र राष्ट्रवादीचे नाना काटे यांनी ९९ हजार मते घेतली होती.
|
Pune : पिस्तूल बाळगणारा गुंड अटकेत, गुलटेकडीत गुन्हे शाखेची कारवाई |
यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी जगताप दीर-भावजयीमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू होती. दोघांनीही उमेदवारीवर दावेदारी सांगितली होती. तर, पक्षातील स्पर्धकांनी जगताप कुटुंबात उमेदवारी देण्यास तीव्र विरोध केला. जगताप कुटुंबात उमेदवारी देऊ नका, एकदाच नगरसेवक झालेल्या व्यक्तीला उमेदवारी न देता आमच्यापैकी काेणालाही उमेदवारी देण्याची मागणी पक्षातील १५ माजी नगरसेवकांच्या गटाने केली. त्यामुळे भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली.
कुटुंबाच्या वादात आमदारकी बाहेर जाण्याची शक्यता वर्तविली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अश्विनी जगताप यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतल्याचे सांगण्यात येत आहे. माजी नगरसेवकांसह आमदार जगताप यांनी शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याची शिफारस पक्षाकडे केली. जगताप दीर-भावजय यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पुण्यात भेट घेतली. आमदार जगताप यांनी शंकर यांना उमेदवारी देण्याची शिफारस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




