
Pune : पुण्यामध्ये पावसाने गुरुवारी हाहा:कार माजवला होता. फक्त यंदाच्या हंगामातीलच नव्हे, तर गेल्या काही वर्षांतील सर्व पावसाळ्यांचे उच्चांक मोडीत काढून बुधवार रात्र आणि गुरुवारी दिवसभर पुणे शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यातच खडकवासला धरणातून सकाळ आणि संध्याकाळी ४० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याचा फटका सिंहगड रोड आणि इतर सखल भागांना बसला. त्यामुळे अनेक कुटुंबं रस्त्यावर आली होती. अनेकांचे संसार उघड्यावर आले. मुसळधार पावसामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
काल दिवसभर रेस्क्यू करत जवळपास १६० कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या सर्वांच्या जेवणाची सोय महापालिकेकडून करण्यात आली होती. १६ ठिकाणी या पूरग्रस्तांसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती. मात्र अचानक नागरिक वाढल्याने अन्न पुरवठा करण्यासाठी माणसं कमी पडली. यावेळी हिंदू, मुस्लिम आणि शीख धर्मियांकडून संयुक्तिकरित्या जेवण बनवण्यात आले.
|
Pune Rain : पुण्यात पावसाचा रुद्रावतार, सर्व उच्चांक मोडले, आजही दक्षतेचा इशारा
|
शीख धर्मियांनी जेवण बनवले, मुस्लिम धर्मीयांनी त्याचे पॅकिंग केले आणि हिंदू धर्मीयांनी त्याचे वाटप केले. या एकत्र जुळून आलेल्या योगायोगामुळे सर्वधर्म एकत्र असल्याचे पाहायला मिळाले.गुरुवारी पुण्यामध्ये खडकवासला धरणातून मोठा विसर्ग सोडण्यात आला होता. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरले होते. पहाटेपासूनच घरामध्ये पाणी शिरल्याने अनेक नागरिक अडकून पडले होते. प्रशासनाकडून हालचाली देखील सुरू होत्या. मात्र या पूरग्रस्तांसाठी खाण्या पिण्याची सोय करणे गरजेचे होते. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी उभारलेल्या शेल्टर होम्समधील नागरिकांना रात्रीचे जेवण देण्यासाठी हिंदू-मुस्लिम-शीख धर्मियांकडून संयुक्त श्रमदान करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी शीख धर्मियांकडून १००० जणांसाठी जेवण बनवण्यात आले. मुस्लिम धर्मीय तरुणांनी या जेवणाचे पॅकेट्स तयार केले. तर हिंदू धर्मीय व गणेश मंडळाचे कार्यकर्ते या अन्नाच्या पॅकेटचे शेल्टर होममध्ये जाऊन वितरित केले. अशा संकट काळात सर्वधर्मीय एकत्रितपणे कसे काम करतात, याचे विधायक रूप बघायला मिळाले.
एखादं संकट आलं तर महाराष्ट्रामध्ये, त्यातही पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात सर्वधर्मीय एकच असल्याची भावना यावेळी पाहायला मिळाली. हिंदू मुस्लिम शीख यांनी एकत्र येऊन कोसळलेल्या नागरिकांना जेवण देऊन संपूर्ण देशात आदर्शवत असे काम केले आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




