किरकटवाडी - 'साहेब आता नाही ना कोणाला मारणार, आता माझी कॅपॅसिटी संपलीय, खुप दुखतंय ना.....' हे 'त्याच' सराईत गुन्हेगाराचे शब्द होते जो 'पोलीसांना काय कोणाच्या बापाला घाबरत नाही', असे म्हणत सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी, खडकवासला परिसरात भर रस्त्यावर सर्वसामान्य नागरिकांना शिवीगाळ, दमदाटी करत दहशत माजवत होता. वैभव इक्कर (वय 23 रा. कोल्हेवाडी, खडकवासला) असे त्या सराईत गुन्हेगाराचे नाव !
रविवारी ( दि.23) सराईत गुन्हेगार वैभव इक्कर व त्याचा साथीदार चेतन चोरघे (वय 27, रा. कोल्हेवाडी, खडकवासला) या दोघांनी सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या हॉटेलमध्ये तोडफोड करत लूटमार केली होती.
तसेच कारवाईसाठी आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली होती. यापुर्वीही अनेक वेळा वैभव इक्कर या सराईत गुन्हेगाराने पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केलेला आहे. तसेच इतरही अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
हॉटेल व्यावसायिकाच्या तक्रारीवरून वैभव इक्कर व त्याचा साथीदार चेतन चोरघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची प्रक्रिया प्रभारी अधिकारी अनमोल मित्तल यांनी सुरू केली आहे.
सर्वसामान्य नागरिकांमध्ये या गुन्हेगाराची असलेली दहशत मोडीत काढण्यासाठी आज सायंकाळी हवेली पोलीसांचे पथक वैभव इक्कर व चेतन चोरघे यांना घेऊन संबंधित हॉटेलमध्ये आले, त्यांचा 'यथेच्छ पाहुणचार' केला.
|
|
तसेच ज्या रस्त्यावर हा गुन्हेगार सर्वसामान्य नागरिकांना भाईगिरी करत त्रास देत होता त्या खडकवासला-किरकटवाडी या गावांच्या शीव रस्त्यावरून त्याची धिंड काढली. या गुन्हेगारांच्या त्रासाने वैतागलेले परिसरातील शेकडो नागरिक काठ्यांचा आवाज ऐकून पोलीसांच्या 'कारवाईचे' कौतुक करताना दिसत होते.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!


























Subscribe to my channel




